शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड. गायके आणि नानासाहेब पाटील यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:33 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले अ‍ॅड. सदाशिव गायके आणि नानासाहेब पाटील यांना मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (दि.२८) न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते.

ठळक मुद्देसुरेश पाटील आत्महत्या प्रकरण

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले अ‍ॅड. सदाशिव गायके आणि नानासाहेब पाटील यांना मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (दि.२८) न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते.अ‍ॅड. गायके यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.१) सत्र न्यायालयात सुनावणी होईल. नानासाहेब पाटील यांच्या जामीन अर्जावरसुद्धा शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.सरकारी वकील सूर्र्यकांत सोनटक्के यांनी गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले की, पोलीस कोठडीत गायके आणि पाटील यांनी तपासामध्ये सहकार्य केले नाही. २० वर्षे छळ करण्यामागचा उद्देश तपासण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची विनंती सोनटक्के यांनी केली. तक्रारदार नितीन सुरेश पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. अभयसिंह भोसले यांनी सरकारी वकिलांना साह्य केले.अ‍ॅड. गायके यांच्या वतीने अ‍ॅड. सोमनाथ, एस. एस. लड्डा आणि अ‍ॅड. सागर एस.लड्डा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपींनी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. पोलिसांनी जुन्याच मुद्यावर वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे. आरोपींकडून काहीही हस्तगत करावयाचे नसल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. नानासाहेब पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. कय्युम शेख यांनीही पोलीस कोठडी देऊ नये, अशी विनंती केली.सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर गायके यांच्या वतीने अ‍ॅड. लड्डा यांनी बुधवारी (दि. २७) सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला असून, त्या अर्जावर शुक्रवारी (दि.१ मार्च) सुनावणी ठेवण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर नानासाहेब पाटीलच्या वतीने अ‍ॅड. कय्युम यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने सरकार पक्षाला त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागून घेतला. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.----------------

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी