प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले! बीफार्मसी, फार्मडी अभ्यासक्रमांसाठी ५० हजार अर्ज

By योगेश पायघन | Published: October 12, 2022 08:32 PM2022-10-12T20:32:43+5:302022-10-12T20:33:05+5:30

ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत

Admission Schedule Collapsed! 50 thousand applications for BPharmacy, PharmD courses | प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले! बीफार्मसी, फार्मडी अभ्यासक्रमांसाठी ५० हजार अर्ज

प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले! बीफार्मसी, फार्मडी अभ्यासक्रमांसाठी ५० हजार अर्ज

googlenewsNext

औरंगाबाद : बी.फार्मसी आणि फार्म डी.साठी अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बुधवारी दुपारपर्यंत राज्यभरातून ४९ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा केंद्रात निश्चित केले आहेत, अशी माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली, तर फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडियाकडून नव्या काॅलेजच्या पडताळणीची प्रक्रिया लांबली. त्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले असून, विद्यार्थ्यांना फार्मसी प्रवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

विद्यार्थ्यांनी बी.फार्मसी आणि फार्म डी.साठी प्रवेशासाठी ४९ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज बुधवार दुपारपर्यंत केलेले होते. त्यापैकी ९ हजार ९ जणांनी पुूर्ण अर्ज भरले. मात्र, सुविधा केंद्रात अर्ज निश्चिती केली नाही. ५ हजार ९३१ जणांनी नोंदणी केली; परंतु अर्ज पूर्ण भरलेला नाही. ऑनलाईन नोंदणी मुदतवाढीनुसार १७ ऑक्टोबर पर्यंत करता येणार आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, १९ पासून २१ ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. हे तात्पुरते वेळापत्रक असून, प्रवेशासंबंधीच्या सूचनेसंबंधात http://ph2022.mahacet.org या संकेतस्थळावरील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.
--
पडताळणीनंतर प्रवेश प्रक्रिया
मराठवाड्यात डिप्लोमाचे १७, तर बी फार्मसीचे ८ नव्या कॉलेजांचे प्रस्ताव फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडियाकडे (पीसीआय) दाखल असून, त्याची तपासणी पीसीआयकडून सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होऊन प्रवेश सुरू होतील. असे तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील स्थिती
कोर्स-महाविद्यालय -प्रवेश क्षमता
डी. फार्मसी -१०४ -६५४०
बी. फार्मसी -८० -६६४०
फार्म डी. -९ -२३०
पदव्युत्तर पदवी - १६ -५९९

Web Title: Admission Schedule Collapsed! 50 thousand applications for BPharmacy, PharmD courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.