शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत प्रशासकीय मान्यता, टेंडर काढण्याची लगबग

By admin | Updated: September 10, 2014 00:53 IST

औरंगाबाद : आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होईल, या भीतीने जिल्हा परिषदेत मंगळवारी काम उरकण्याची पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांना घाई झाली होती.

औरंगाबाद : आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होईल, या भीतीने जिल्हा परिषदेत मंगळवारी काम उरकण्याची पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांना घाई झाली होती. पंचायत विभागाच्या जनसुुविधा योजनेच्या १२ कोटी ८२ लाख रुपये खर्चाच्या कामास आज अंतिम क्षणी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. गणेश विसर्जनानंतर आचारसंहिता लागणार, निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद बोलावली, अशा बातम्या दूरचित्रवाणीवरून आज सकाळपासून प्रसारित होत होत्या. त्यामुळे आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार, असे चित्र सकाळपासूनच होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत सकाळपासूनच गर्दी झालीहोती. पदाधिकारी, अधिकारी, सदस्य, नागरिक आणि कंत्राटदारांनी सकाळपासूनच परिसरात तळ ठोकला होता. संचिका वेगाने या टेबलवरून त्या टेबलवर फिरत होत्या. विशेषत: मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण सकाळपासून त्यांच्या कक्षात ठाण मांडून होते. कंत्राटदार त्यांच्या संचिकांचा पाठलाग करताना दिसत होते. संचिकांवर अंतिम निर्णयही आज झटपट दिले जात होते. पंचायत, वित्त, बांधकाम, सिंचन आदी विभागांत विशेष वर्दळ होती. १२ कोटी ८२ लाखांच्या कामास प्रशासकीय मंजुरीआॅगस्ट महिना संपता-संपता जवळपास ६० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातील अनेक कामांची टेंडर प्रक्रिया आज वेगाने पूर्ण करण्यात आली. याशिवाय पंचायत विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या जनसुविधा योजनेची संचिका एका दिवसात सर्व टेबलांवर फिरून सायंकाळी वित्त विभागात मंजुरीसाठी दाखलझाली. या योजनेस जिल्हा विकास समितीकडून १० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यात गेल्या वर्षी १ कोटी ७७ लाख रुपयांचे दायित्व वगळून ८कोटी २३ लाख रुपयांच्या दीडपट रकमेचे (१२ कोटी ८३) नियोजन विभागाने केले असून, त्यातून घेतल्या जाणाऱ्या २२७ कामांना आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली.