शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यावरुनच चालतो तलाठ्यांचा कारभार

By admin | Updated: September 10, 2014 00:48 IST

वडवणी : वडवणी तालुक्यातील जवळपास सर्वच तलाठी तालुक्यावरुनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची परवड होत आहे.

वडवणी : वडवणी तालुक्यातील जवळपास सर्वच तलाठी तालुक्यावरुनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची परवड होत आहे. विविध कागदपत्रे काढण्यासाठी त्यांना थेट वडवणीला यावे लागत आहे. अशा या तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.वडवणी तालुक्यात एकूण १४ तलाठी सज्जे असून, वडवणी व कवडगाव हे दोन मंडळ अधिकारी कार्यालये आहेत. ४९ गावांचा कारभार पाहण्यासाठी ११ तलाठी आहेत. ११ तलाठ्यावरच संपूर्ण तालुक्याचा कारभार चालतो.शासनाने ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन तलाठी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधण्यात आली. मात्र एकही तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील सर्वच तलाठी वडवणीतूनच सज्जांचा कारभार हाकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी व कागदपत्रे घेण्यासाठी वडवणी शहरात यावे लागते. विशेष म्हणजे येथे आल्यानंतरही या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागते.विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन कागदपत्रे देण्याचा कारभारही हे तलाठी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.तालुक्यातील १४ सज्जापैकी एकाही सज्जावर तलाठी हजर नसतो. साळिंबा, खडकी, पुसरा, चिंचोटी, कवडगाव, चिखलबीड, चिंचाळा, तिगाव, देवडी, वडवणी, काडीवडगाव, देवळा, चिंचवण असे एकूण १४ तलाठी सज्जे आहेत. या १४ तलाठी सज्जाचा कारभार ११ तलाठी पाहतात. सज्जावरच्या कार्यालयात न राहता हे तलाठी किरायाच्या खोल्यांमध्ये वडवणी शहरात राहतात. सध्या शासनाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी जात प्रमाणपत्र, रहिवाशी, कुटुंब मर्यादा प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे महत्वाची ठरत आहेत. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थी या तलाठ्यांचा शोध घेत असतात. आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे हे तलाठी किरायाच्या खोल्या बदलत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.ज्याठिकाणी कार्यालये उभारण्यात आलेली आहेत त्याठिकाणी हे तलाठी हजर रहात नसल्याने ही कार्यालये शोभेची वस्तू बनू लागले आहेत. विद्यार्थी, शेतकरी यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.याबाबत तहसीलदार एन.जी. झंपलवाड म्हणाले, तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या तलाठ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, याची काळजी घेऊ. (वार्ताहर)