शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावरुन होणार ३४ शिक्षकांचे समायोजन

By admin | Updated: August 20, 2014 01:50 IST

उमरगा : तालुक्यातील जि.प. च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्येत घट झाल्याने ६८ शिक्षक अतिरिक्त झाले असून, ३३ शिक्षकांचे तालुक्यात विविध शाळांमधून

उमरगा : तालुक्यातील जि.प. च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्येत घट झाल्याने ६८ शिक्षक अतिरिक्त झाले असून, ३३ शिक्षकांचे तालुक्यात विविध शाळांमधून समायोजन करण्यात येणार असले तरी उर्वरित ३४ शिक्षकांचे जिल्हास्तरावरुन समायोजन करण्यात येणार असल्याने मागील अनेक वर्षापासून एकाच तालुक्यात कार्यरत असलेल्या ३४ शिक्षकांवर आता जिल्हा समायोजनाची टांगती तलवार आहे.तालुक्यात जि.प. च्या एकूण १५१ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. पहिली ते आठवीपर्यंत एकूण ९ हजार २६५ मुले तर ९ हजार ९४९ मुली असे एकूण १९ हजार ८१४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ९ वी ते १० या माध्यमिक शाळांतून एकूण ८०१ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी ५४१ पुरुष ९ वी ते १० वी या दोन वर्गासाठी ९२ शिक्षक माध्यमिक शाळांतून ज्ञानार्जन करीत आहेत.शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने ३० सप्टेंबर २०१३ च्या विद्यार्थी संख्येवरुन शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. ३० सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर तालुक्यातील जि.प. १५१ विविध शाळांमधून ६८ शिक्षक अतिरिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. जन्मतारीख, प्रथम नेमणूक दिनांक, तालुक्यातील उपस्थित दिनांक ३० सप्टेंबर रोजी तालुक्यातील एकूण सेवा, सध्याच्या शाळेवरील उपस्थिती दिनांक, सध्याच्या शाळेवर ३० सप्टेंबर २०१३ पर्यंत एकूण सेवा, पती, पत्नी सेवेत असल्यास नाव पद व कार्यालय, अपंग, विधवा, परित्यक्त्या, मतिमंद विद्यार्थी, पालक, १२ वी शिक्षण शाखा या प्राधान्यक्रमाच्या निकषानुसार अतिरिक्त ठरलेल्या ६८ शिक्षकांची सेवाजेष्ठतेनुसार यादी तयार करण्यात आली आहे. १५१ शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या ३३ शिक्षकांचे तालुक्यातील विविध शाळेत रिक्त पदावर समायोजन करण्यात येत असले तरी सेवाजेष्ठतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या ३४ शिक्षकांचे जिल्हास्तरावरुन समायोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जिल्हास्तरावरून समायोजन होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक तालुक्यांतून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन आता इतरत्र जिल्ह्यात होणार का? अशी धास्ती अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सतावत आहे. (वार्ताहर)