शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

लातूर-उदगीरात अवैध वाहनांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:56 IST

लातूर / उदगीर : अवैध वाहतुकीवर ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर उदगीर आणि लातूर शहरात पोलीस प्रशासनाकडून एकूण २९ अवैध

लातूर / उदगीर : अवैध वाहतुकीवर ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर उदगीर आणि लातूर शहरात पोलीस प्रशासनाकडून एकूण २९ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. उदगीर येथे उपविभागीय अधिकारी व शहर पोलिसांनी रस्त्यावर उतरत १४ अवैध वाहनांवर कारवाई केली़ काळी-पिवळी जीप व मिनी बस अशा एकूण १४ गाड्या शहर पोलीस ठाण्यात उभ्या करण्यात आल्या़ लातुरातही वाहतूक शाखा व पोलिस प्रशासनाकडून शुक्रवारी दिवसभर अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली.कल्लूरजवळ झालेल्या भीषण अपघातानंतरही अवैध वाहतूक जैसे थे असल्याचे ‘लोकमत’ चमूने स्टिंग आॅपरेशन करुन मांडल्यानंतर पोलिसांना कारवाईची जाग आली़ शुक्रवारी सकाळपासूनच पोलिसांनी रस्त्यावर उतरुन अवैध वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली़ पोलीस रस्त्यावर उतरत असल्याचे लक्षात येताच काही वाहनांनी पळ काढला़ या कारवाईदरम्यान १४ गाड्या ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या़ पहिल्यांदाच कारवाई झालेल्या गाड्यांना आर्थिक दंड (एक हजार रुपये) तर पहिला दंड होऊनही रस्त्यावर उतरलेल्या गाड्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई होत असल्याने प्रशासनाला उशिरा का होईना, पण जाग येत असल्याचे चित्र आहे़ घटना घडण्याच्या एक दिवसापूर्वीच पोलीस उपविभागीय अधिकारी अनिकेत भारती यांनी नव्याने रुजू झालेले सपोनि वाहतूक शाखा सुधीर सूर्यवंशी यांच्यासमवेत अवैध वाहतूक व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई केली होती़ शहरात झालेल्या कारवाईनंतर बसस्थानक परिसरास अवैध वाहनांचा विळखा सैल झाला़ अशाच कारवाया सातत्याने झाल्या तरच अवैध वाहतुकीवर वचक बसेल, अशी कुजबूज कारवाईदरम्यान उपस्थितांमध्ये होती़ शहरातील कारवाईसोबतच ग्रामीण पोलीस ठाण्यांनीही आपआपल्या हद्दीत अशा प्रकारच्या कारवायात सातत्य ठेवल्यास नुकत्याच झालेल्या अपघातासारख्या घातक घटना घडणार नाहीत़