शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर २३ पैकी ७ मालमत्तांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:06 IST

औरंगाबाद : बीड बायपास रोडवर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रुंदीकरण मोहीम राबविली होती. २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील ...

औरंगाबाद : बीड बायपास रोडवर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रुंदीकरण मोहीम राबविली होती. २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी महापालिकेने पाडापाडीला सुरुवात केली. दिवसभरात सात मालमत्ता पाडण्यात आल्या.

बीड बायपास रस्ता वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक होताच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बीड बायपासवर पाडापाडी सुरू केली. काही मालमत्ताधारकांनी मोहिमेला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर बुधवारी (दि. १०) महापालिकेने २३ मालमत्तांवर कारवाई करण्यासाठी मार्किंग केले होते. दरम्यान, मालमत्ताधारकांनी स्वतःहून बाधित मालमत्ता काढून घ्याव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव विभागातर्फे पाडापाडी सुरू करण्यात आली. महानुभाव आश्रम चौकाच्या बाजूने रस्त्याने बाधित होणारा मालमत्तांचा भाग दिवसभर पाडण्यात आला. दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. त्यात रफिक खान उस्मान खान, सय्यद मोसीन सय्यद रहीम, शेख रफिक, शेख मुनीर, शकील शेख, मो. अफसर मो. इब्राहिम, इलियास पटेल, इब्राहिम पटेल, शेख कदीर यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, शाखा अभियंता संजय चामले, संजय कपाळे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मझहर अली, पी. बी. गवळी, आर. एस. सुरासे, अतिक्रमण हटाव विभागाचे पोलीस निरीक्षक फहीम हाश्‍मी यांच्या पथकाने केली.