शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघाचे राजाबाजारात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 01:14 IST

औरंगाबाद : ‘आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव आये है, नयी रोशनी लाये है’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात रविवारी चातुर्मासानिमित्त आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघाचे राजाबाजार येथील जैन मंदिरात आगमन झाले.

औरंगाबाद : ‘आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव आये है, नयी रोशनी लाये है’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात रविवारी चातुर्मासानिमित्त आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघाचे राजाबाजार येथील जैन मंदिरात आगमन झाले. सकाळी अरिहंतनगर जैन मंदिरातून पदयात्रेला सुरुवात झाली. बालाजीनगर जैन मंदिर, मोंढा नाकामार्गे महाराजांचे राजाबाजारात आगमन झाले. महाराजांसमवेत मुनीश्री सुयशगुप्तीजी, मुनीश्री चंद्रगुप्तजी, आर्यिका सुनिधीमती माताजी, आर्यिका सुनिती माताजी यांचेही आगमन झाले. जैन पंचायतच्या वतीने महाराजांचे स्वागत करण्यात आले. पदयात्रेदरम्यान रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिला डोक्यावर मंगलकलश घेऊन अग्रभागी चालत होत्या. सर्वप्रथम पंचायतच्या वतीने आचार्यश्रींचे पादप्रक्षालन करण्यात आले. आचार्यश्रींनी भगवान शांतीनाथांचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केला. यावेळी मुनीश्री सुयशगुप्तीजी यांनी सांगितले की, आचार्यश्रींचे चातुर्मासानिमित्त आगमन झाले आहे.चातुर्मास कालावधीत भाविकांनी ‘थ्रीजी व फोरजी’ वरील लक्ष कमी करून गुरुदेवांकडे जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून तुम्हाला समाजाविषयी ज्ञान प्राप्त होईल. औरंगाबादेतील जैन समाजाच्या सामाजिक एकतेची प्रशंसा करून गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी चातुर्मासात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी पंचायत व चातुर्मास समितीचे अध्यक्ष ललित पाटणी, अशोक अजमेरा, डॉ. रमेश बडजाते, न्या. कैलासचंद चांदीवाल, डी. बी. कासलीवाल, माणिकचंद गंगवाल, एम. आर. बडजाते, चांदमल चांदीवाल, भागचंद बिनायके, किरण पहाडे, विनोद लोहाडे, अशोक गंगवाल यांच्यासह समाजबांधव हजर होते. चातुर्मास कलश स्थापना चातुर्मासामध्ये १९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव. २२ रोजी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांचा २६ वा दीक्षा दिवस व चातुर्मास कलश स्थापनेचा कार्यक्रम सराफा येथील अग्रसेन भवन येथे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.