हातकडी टोचत असल्याचे नाटक करत पोलिसांच्या गाडीतून आरोपीचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 15:21 IST2021-02-10T14:41:17+5:302021-02-10T15:21:09+5:30
Crime News : आज पोलीस कर्मचारी त्याला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करणार होते.

हातकडी टोचत असल्याचे नाटक करत पोलिसांच्या गाडीतून आरोपीचे पलायन
औरंगाबाद: पोलीस वाहनात बसलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देउन पलायन केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी १२:४० वाजता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर घडली.
अमर भाऊसाहेब गायकवाड(रा.मुकुंदवाडी)असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी अमर याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका जणाला मारहाण करून त्यांच्या खिशातील २ हजार ७०० रुपये लुटले होते. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला मंगळवारी रात्री अटक केली होती. आज पोलीस कर्मचारी त्याला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करणार होते. याकरिता पोलिसांनी त्याला दुपारी ठाण्यासमोरील पोलीस वाहनात बसविले. याचवेळी अमरने त्याच्या हातातील हातकडी फिट झाल्यामुळे टोचत असल्याचे नमूद केले.
Breaking : अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी
सुन्न करणारी घटना; प्रियकराने पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रेयसीची मृत्यूशी झुंज संपली
यामुळे पोलीस त्याच्या एका हातातील हतकडी काढून दुसऱ्या हातात लावत होते. याचवेळी त्याने पोलिसांच्या हाताला झटका देउन पलायन केले. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो त्यांना चकमा देण्यात यशस्वी झाला. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.