शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी भरतीला आचारसंहितेचा ब्रेक

By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST

लातूर : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गच्या अंगणवाडीच्या ९ सेविका व ३७ मदतनीस अशा ४६ पदांच्या भरतीस ब्रेक लागला आहे़

लातूर : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गच्या अंगणवाडीच्या ९ सेविका व ३७ मदतनीस अशा ४६ पदांच्या भरतीस ब्रेक लागला आहे़ निवडणुकीनंतर या भरती प्रक्रियेस वेग येणार आहे़बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग-१ अंतर्गत जिल्ह्यात १७५ अंगणवाड्या मंजूर झाल्या असून त्यापैकी १६७ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ यापैकी लातूर शहरात १३० अंगणवाड्या आहेत़ उदगीर शहरात २९ अंगणवाड्या आहेत़ अहमदपूर व औसा शहरात प्रत्येकी ४ अंगणवाड्या आहेत़ निलंगा शहरासाठी ४ अंगणवाड्या मंजूर झाल्या आहेत़ पण त्या मनुष्यबळाअभावी अद्यापही चालू नाही़ या अंगणवाड्या सुरु करण्यासाठी पदभरती करण्यास प्रारंभ करण्यात आला होता़त्या अंतर्गत सेविका, मदतनीस अशा ४६ पदांच्या रिक्त पदावरील भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले होते़ लातूर शहरातील अंगणवाड्यासाठी १४ मदतनिसाची पदे रिक्त होती. उदगीरच्या ८ मदतनिसाची पदे रिक्त होती़ अहमदपूर अंगणवडीसाठी २ सेविका व ६ मदतनीस तर औश्यासाठी ३ सेविका, ५ मदतनीस पदे़ निलंग्यासाठी सेविका-४, मदतनीस-४ रिक्त पदाची एकूण ४६ रिक्तपदांची भरतीसाठी बाल विकास विभागाकडे एकूण ८३४ अर्ज प्राप्त झाल़े यात सर्वाधिक अर्ज ४७६ लातूरसाठी प्राप्त झाले होते़ या अर्जातील ६५ अर्ज पात्र झाले तर ४११ अर्ज अपात्र ठरले़ उदगीरसाठी १५८ अर्ज प्राप्त झाले़ २८ अर्ज पात्र, १३० अर्ज अपात्र ठरले आहेत़ अहमदपूरसाठी ९१ अर्ज प्राप्त झाले़ ३४ अर्ज पात्र, ५७ अर्ज अपात्र ठरले आहेत़ औसाच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसपदासाठी ४२ अर्ज प्राप्त झाले यामध्ये १९ अर्ज पात्र तर २३ अपात्र ठरले आहेत़ निलंग्यासाठी ६७ अर्ज प्राप्त झाले, यात २४ अर्ज पात्र तर ४३ अपात्र ठरले आहेत़ एकूण अर्जापैकी १७० अर्ज पात्र तर ६६४ अर्ज अपात्र ठरले आहेत़ ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी भरती प्रक्रिया ही निवडणूकीनंतरच होणार आहे़ त्यामुळे पात्र उमेदवामध्ये नाराजी पसरली आहे़ विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतरच या रिक्त पदांची भरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़लातूर शहरातील अंगणवाड्यांमध्ये १४ मदतनीसांची पदे रिक्त आहेत़ ही पदे भरण्यासाठी अर्जही मागविण्यात आले होते़ परंतु, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या भरती प्रक्रियेस स्थगिती मिळाली असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी गिरी यांनी सांगितले़