शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
3
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
4
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
5
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
6
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
7
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
8
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
9
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
10
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
11
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
12
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
13
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
14
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
15
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
16
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
17
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
18
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
19
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
20
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरांच्या सहनशक्तीची परीक्षा; उन्हाच्या तडाख्यात महावितरणमुळे शहर होरपळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:55 IST

गुरुवारसह शुक्रवारीही वीजपुरवठा खंडित : वीजवाहिन्या, उपकरणे निकामी, उपकेंद्रांची क्षमता संपली

छत्रपती संभाजीनगर : गुरुवार, शुक्रवारी तापलेल्या उन्हाच्या झळांबरोबरच महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक होरपळून निघाले. उन्हाळ्यात ४० टक्के विजेची मागणी वाढलेली असताना शहराला वीजपुरवठा करणाऱ्या २८ उपकेंद्रांची क्षमता धापा टाकत आहे. वाढत्या तापमानामुळे गुरुवारी वीजवाहिन्यांचे भाग, उपकरणे जळून गेल्याने बारा तासांपेक्षा अधिक काळ अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने लाखो नागरिकांना नाहक हाल सोसावे लागले.

गुरुवारसह शुक्रवारी अर्ध्याअधिक शहरात सहा ते सात वेळा १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचा संताप झाला. अनेक भागांत दुपारपासून वीज नसल्याने बाजारपेठ ठप्प होऊन लाखोंच्या उलाढालीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत जवळपास ४० टक्के वीजपुरवठ्यावर अधिक भार वाढला. नागरिकांनी सातत्याने हेल्पलाईनवर संपर्क करूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित होण्याचा मेसेज येणे अपेक्षित असताना तो आला नाही. नागरिकांनी केंद्रावर जाऊन विचारणा केल्यावरही असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. एकीकडे उकाडा वाढला असताना महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा पारा चढला होता.

या परिसरात वीजपुरवठा खंडित
- मदनी कॉलनीत गुरुवारी सायं. ५ ते रात्री ११
- गुरुदत्त नगर, गजानननगर, विजयनगर : १४ तास वीज नाही; महावितरणकडून उद्धट उत्तरे
- गारखेडा, शिवाजीनगर, आदित्यनगर : शुक्रवारी सकाळी ६ ते ८, गुरुवारी सायं. ४:३० ते रात्री ११:३०
- देवळाई, माऊलीनगर, नाईकनगर, खडी रोड : गुरुवारी ५ तास, शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३
-पुंडलिकनगर : गुरुवारी रात्री १० ते मध्यरात्री २
- नारेगाव : गुरुवारी रात्री ८ ते पहाटे ४

- शहर मंडळात ३३ केव्ही क्षमतेची एकूण २८ उपकेंद्रे.
-११ केव्ही क्षमतेचे २१० फीडर

ग्राहक संख्या
घरगुती - ३ लाख ९ हजार ९५७
व्यावसायिक - ३६ हजार ७३४
औद्योगिक -६ हजार ९३८
इतर - ६ हजार ४१५
एकूण - ३ लाख ६० हजार ४४

१८ % वीजपुरवठा अपुरा
सामान्यत: शहरात ३१९ मेगावॅटपर्यंत वीजपुरवठा हाेतो. एप्रिल, मेमध्ये ३८० ते ४०० मेगावॅटपर्यंत मागणी वाढते. या वाढलेल्या १८ टक्के विजेची मागणी पूर्ण करण्याची क्षमता महावितरणकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उपकरणे जुनाट, क्षमता संपली
- मुख्य वीजपुरवठ्याचे १३२ केव्ही केंद्र शहराबाहेर असल्याने वीजवाहिन्यांवर ताण येतो. याचे एक केंद्र शहरात असणे अपेक्षित. मात्र, हा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित.
- उन्हाळ्यात फ्रीज, फॅन, कूलर, एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढल्यानंतर जुनाट, क्षमता संपलेल्या उपकरणांना हा भार असह्य होतो. यासाठी महावितरणकडे ठोस आराखडाच नाही.
- एकीकडे वाढत्या वसाहती, मोठ्या इमारतींची संख्या वाढताना ३३/११ केव्ही उपकेंद्रांची क्षमता कमी पडल्याने दाब वाढून वीजपुरवठा खंडित होतो.

समस्या कायमची संपेल
ओव्हरलोड टाळण्यासाठी लवकरच दोन नवीन वीजवाहिन्यांना मंजुरी मिळणार आहे. १२ उपकेंद्रांची क्षमता वाढविली जाणार असून, कडा येथे १३२ केव्हीचे नवीन उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.
– मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरelectricityवीज