शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांसह ९३४ कर्मचारी सात महिन्यांपासून ‘बिनपगारी’..!

By admin | Updated: July 31, 2014 00:43 IST

लातूर : व्यापारी गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या लातूर नगरीची विलासरावांच्या पश्चात काय स्थिती आहे याचा नमुणा पहायचा असेल तर महापालिका हे उत्तम उदाहरण आहे.

लातूर : व्यापारी गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या लातूर नगरीची विलासरावांच्या पश्चात काय स्थिती आहे याचा नमुणा पहायचा असेल तर महापालिका हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या सात महिन्यांपासून मनपाचे मुख्य कारभारी असलेल्या आयुक्तांसह तब्बल ९३४ कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून अनेक कर्मचाऱ्यांच्या घरांनी ‘बिनपगारी’ चालू आहे. त्यामुळे उद्या दि. १ आॅगस्टपासून हे सारे कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. जर असे झाले तर शहराचा गावगाढाच कोसळण्याच्या तयारीत आहे. स्थापनेपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मनपाचा गाढा भलताच आर्थिक गर्तेत सापडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून लातूरला नवी महापालिका झाली खरी. पण त्या नव्याची नवलाई आता संपून गेली आहे. विलासराव गेले आणि जणू लातूरची अवकळा झाली अशी स्थिती झाली आहे. आयुक्तांसारख्या क्लासवन अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत तब्बल ९३४ कर्मचाऱ्यांच्या पोटाचे निव्वळ वेतन नसल्याने वांदे वाढले आहेत. जिथं कारभारीच वेतनाविना आहेत, तिथं तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या अवस्था काय असतील याची कल्पनाच न केलेली बरी. मनपाला वेतनापोटी दर महिन्याला एक कोटी ७५ लाख रुपये लागतात. त्याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनपोटी २५ लाख रुपये दरमहा लागतात. सर्व कर्मचाऱ्यांचे मिळून सात महिन्याचे १४ कोटी रुपये थकले आहेत. प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना तितकासा त्रास नसला तरी वेतनच थांबल्याने अनेक तृतीयच्या ११७ आणि आणि चतुर्थच्या श्रेणीच्या ८१५ कर्मचाऱ्यांसमोर खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या प्रवेशापासून, आलेल्या प्रत्येक सणांत त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे. मनपात सावकारांचा अड्डाकर्मचाऱ्यांच्या थकलेल्या वेतनाचा लाभ आपसुक सावकार उचलित आहेत. अनेक खासगी सावकारांनी आपला डेरा सध्या महापालिकेत टाकला आहे. एका कर्मचाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्याने गेल्या चार महिन्यांपासून सावकारांकडून दरमहा २५ हजार रुपये घेतले आहेत. ज्या एक लाखापोटी आता सावकार त्याला चार लाख रुपयांची व्याजासह मागणी करीत आहेत. संप मिटेल : आयुक्त महापालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आम्ही तातडीने पैसे उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे लवकरात लवकर पगारी होतील. कर्मचाऱ्यांच्याच पगारी होत नसल्याने आयुक्तांना कसे वेतन घेता येईल ? त्यामुळे माझेही वेतन झालेले नाही हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन आयुक्त सुधाकर तेलंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. लातूरवर जकातीपोटीचे सहायक अनुदान एका वर्षानंतर बंद करणे अन्यायकारक : शैलेश स्वामी नगरपरिषदांना जकातीपासून उत्पन्न मिळे. त्यातून कर्मचाऱ्यांची वेतने होत. जकाती बंद झालेल्या ठिकाणी जकातीचे सहाय्यक अनुदान मिळे पुढे त्यातून कर्मचाऱ्यांची वेतने झाली. राज्य शासनाच्या वतीने जळगाव, अहमदपूर, अकोला यासारख्या महापालिकांच्या घोषणेवेळी त्यांचे जकातीचे अनुदान सलग पाच वर्ष टप्प्या-टप्प्याने कमी करीत पुरविले. लातूर महापालिकेच्या घोषणेनंतर मात्र अवघ्या एका वर्षात जकातीपोटीचे सहाय्यक अनुदान बंद केले. त्यात ७४ व्या घटनादुरूस्तीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वावलंबन धोरणांमुळे वेतन अनुदान बंद झालेले. एलबीटीचे भूत आले, पण राज्य शासनाच्याच धरसोड वृत्तीमुळे अद्याप एलबीटी भरण्याची प्रक्रिया सुरळीत नाही. मग एक हजार कर्मचाऱ्यांचे पगार करायला मनपाकडे पैसा कुठे आहे ? असा प्रश्न नगरसेवक शैलेश स्वामी यांनी केला. केवळ सफाई कामगारांबद्दलच्या कठोर कायद्यामुळे त्यांचे वेतन होत असले तरी लातूरच्या मनपाने त्यांचेही वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रोखले असल्याचे त्यांनी सांगितले.