शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

९६ हजार नागरिकांना मिळणार प्रमाणपत्र

By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST

रेणापूर : रेणापूर सेतू सुविधा केंद्रातून २०१३-१४ या वर्षात एकूण ८१ हजार सातबारा तर १५ हजारावर विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

 रेणापूर : रेणापूर सेतू सुविधा केंद्रातून २०१३-१४ या वर्षात एकूण ८१ हजार सातबारा तर १५ हजारावर विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून येत्या शैक्षणिक वर्षात लागणारी विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्राकडे प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. सातबारा वितरणात रेणापूर तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. रेणापूरच्या सेतू केंद्रातून सर्वसामान्यांना व शिक्षणासाठी जी विविध प्रमाणपत्रे वितरित केली जातात. शिवाय शेतकर्‍यांना लागणारे सात-बारा, आठ अ उतारा सेतू केंद्रामार्फत दिला जातो. सन २०१४-१४ या वर्षात रेणापूरच्या सेतू केंद्रातून जातीची व इतर विविध प्रमाणपत्रे वितरित करून जिल्ह्यात या सेतू केंद्राने आघाडी मिळविली. शिवाय सातबारा व आठ अ उतारा वाटप करणारे जिल्ह्यातील रेणापूरचे सेतू केंद्र आघाडीवर राहिले. सातबारा, आठ - अ- ८१ हजार ८१७ वाटप करून रेणापूर सेतू केंद्र जिल्ह्यात सर्वाधिक सात-बारा, आठ-अ वितरित करणारे सेतू केंद्र ठरले. प्रतिवर्षी सेतू केंद्रातून शिक्षणासाठी लागणारी जातीची प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असतात. पाल्यांची वरील प्रमाणपत्र काढण्यासाठी ऐनवेळी पालक सेतू केंद्राकडे धाव घेतात. त्यामुळे सेतू केंद्रात एकच गर्दी होते. त्यात सेतू केंद्रातील कर्मचार्‍यांना त्रास तर होतोच; शिवाय पालकांची ही मोठी गैरसोय होऊन त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. या गोष्टी टाळण्यासाठी तालुक्यातील पाल्यांनी आतापासूनच प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्राकडे प्रस्ताव सादर करावेत जेणेकरून शाळा सुरू होण्यापूर्वी पाल्यांना प्रमाणपत्र घेऊन शाळेत प्रवेश मिळणे सोयीस्कर होईल, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड, सेतूचे व्यवस्थापक ज्ञानोबा कांबळे यांनी केले आहे. (वार्ताहर)