बनावट कागदपत्राधारे उचलले ८५ हजार

By Admin | Updated: August 18, 2014 01:00 IST2014-08-18T00:32:51+5:302014-08-18T01:00:41+5:30

रेणापूर : एका मयत व्यक्तीला तीन वारस असताना बनावट कागदपत्राअधारे आपण एकटेच वारस असल्याचे दाखवून वडिलांच्या नावे असलेली

85 thousand pieces of fake documents taken | बनावट कागदपत्राधारे उचलले ८५ हजार

बनावट कागदपत्राधारे उचलले ८५ हजार




रेणापूर : एका मयत व्यक्तीला तीन वारस असताना बनावट कागदपत्राअधारे आपण एकटेच वारस असल्याचे दाखवून वडिलांच्या नावे असलेली ८५ हजार रुपयांची रक्कम उचलल्या प्रकरणी पाच जणांविरूद्ध रविवारी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सेलू जवळगा येथील नारायण बोंबडे यांचा २ जून २००९ रोजी मृत्यू झाला़ त्यांना शिवाजी बोंबडे, बब्रुवान बोंबडे, फिर्यादी भागवत बोंबडे अशी तीन मुले आहेत़ मयत नारायण बोंबडे यांच्या नावे सेलू शिवारात ४ हेक्टर १५ आऱ शेती आहे़ गारपीटीचे १० हजार रूपयांचे अनुदान खरोळा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत खाते क्ऱ ११०२ वर जमा झाले होते़ ही रक्कम उचलण्यासाठी मयत नारायण बोंबडे यांच्या तीन वारस मुलांपैैकी शिवाजी बोंबडे यांनी इतर दोघांची संमती न घेता पाचजणांशी संगणमत करून बनावट कागदपत्रे तयार केली़ ही कागदपत्रे बँकेकडे सादर करून शिवाजी बोंबडे हे एकच वारस असल्याचे नमूद करित बँकेतील मयत नारायण बोंबडे यांच्या नावावरील ८५ हजार ६३३ रूपये ८ फेब्रुवारी रोजी २०१० रोजी उचलले़ याप्रकरणी भागवत बोंबडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी बोंबडे, नामदेव बोंबडे, ग्रामसेविका दुभते, किसन कोंपले, बालाजी पनगुले (रा़ सेलू खु़) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोनि़ दिलीप पाटील करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: 85 thousand pieces of fake documents taken