८४ सिमेंट बंधार्‍यांचे काम सुरू

By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T00:52:31+5:302014-05-27T01:01:53+5:30

नांदेड :जिल्ह्यात ८४ सिमेंट बंधार्‍यांना मंजुरी दिली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी एस़ पी़ पैलवाड यांनी दिली़

84 Work of Cement Bonds | ८४ सिमेंट बंधार्‍यांचे काम सुरू

८४ सिमेंट बंधार्‍यांचे काम सुरू

 नांदेड :जि़प़च्या लघूपाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्ह्यात ८४ सिमेंट बंधार्‍यांना मंजुरी दिली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती लघूपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी एस़ पी़ पैलवाड यांनी दिली़ लघूपाटबंधारे विभागाला २०१३-१४ मध्ये ६ कोटी ८९ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे़ त्यातून ही बंधार्‍यांची कामे हाती घेण्यात आली आहेत़ या बंधार्‍यांची प्रशासकीय मान्यता फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये दिली आहे़ ग्रामपंचायतींमार्फत या बंधार्‍याचे काम सुरू आहे़ या कामाच्या गुणवत्तेबाबत विचारले असता पैलवाड यांनी विभागाकडून संबंधितांना सूचना दिल्याचे सांगितले़ लघूपाटबंधारे विभागाच्या सिंचन तलाव, पाझर तलाव, मालगुजारी तलाव, कोल्हापुरी बंधार्‍यांची अवस्था वाईट झाली असली तरी या तलावाच्या देखभालीसाठी शासनाने २०११ पासून निधीच दिला नसल्याची बाबही पुढे आली आहे़ लघूपाटबंधारे विभागातील अखत्यारित असलेल्या तलावांची संख्या ही जवळपास ४०० आहे़ तसेच विभागातील कार्यरत कर्मचार्‍यांची संख्याही अपुरी आहे़ विभागाला १९ कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजूर आहेत़ प्रत्यक्षात १० कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत़ राज्यात सिंचनाच्या मोठ्या प्रकल्पांना मान्यता जवळपास दिली जात नाही़ त्यामुळे आहेत ती लहान प्रकल्प सांभाळण्याची गरज आहे़ त्यातूनच पाण्याची पातळी उंचावण्याचे काम होईल़ याकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांना लक्ष देण्याची गरज आहे़ पदाधिकार्‍यांनी मात्र बंधार्‍यांसाठी येणारा निधी आपल्या गटात नेण्यासाठी चढाओढ केली असली तरी या बंधार्‍यांच्या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्षच केले आहे़ बंधार्‍यांचे काम आपल्या मर्जीतील लोकांना कसे मिळेल याकडेच जास्त लक्ष दिले जात आहे़(प्रतिनिधी)

Web Title: 84 Work of Cement Bonds