शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामांचे ७५०० उद्दिष्ट

By admin | Updated: February 27, 2016 00:14 IST

कळमनुरी : चालू वर्षात स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्याला शौचालय बांधकामाचे ७५०० चे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांनी दिली.

कळमनुरी : चालू वर्षात स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्याला शौचालय बांधकामाचे ७५०० चे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांनी दिली.स्वच्छ भारत अभियानांतर्गत वार्षिक कृती आराखडा २०१६- १७ या वर्षात ग्रामपंचायत निवडीची प्रक्रिया राबविण्यासाठी पं. स. च्या सभागृहात सरपंच व ग्रामसेवकांची बैठक झाली. पं. स. सभापती महानंदा लोणे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, एस. टी. खंदारे, मंगला कुबडे, साहेबराव बळवंते, राजेंद्र सरकटे आदी उपस्थित होते. २०१६-१७ या वर्षात नदीकाठची गावे, तीर्थक्षेत्राची गावे, बाजारपेठेची गावे, नळयोजना मंजूर असलेली गावे, या गावातील २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार प्राधान्यक्रम ठरवून जि.प. व पं.स. सदस्यांच्या शिफारशीने गावे निवडून नागरिकांस वैयक्तिक शौचालयासाठी बारा हजाराचे अनुदान वितरीत केले जाणार आहे. वार्षिक कृती आराखड्यात सहभाग घ्यावयाचा आहे, त्या ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव २८ फेब्रुवारीपर्यंत पं.स. कडे सादर करावेत. २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १०० टक्के गाव पाणंदमुक्त करणाऱ्या किल्लेवडगाव, पेठवडगाव, कोंढूर, पुयना, फुटाणा या गावातील सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. प्रमोद मोहीते, संतोष भोजे, सतीश चव्हाण, शेख, शैनोद्दीन, आर.जी. श्रावणे, आर.डी. कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)