शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दुधना प्रकल्पात ७३ टक्के साठा

By admin | Updated: September 5, 2014 00:13 IST

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात प्रथमच ७३ टक्के जलसाठा झाल्यामुळे सेलू शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मोहन बोराडे, सेलूनिम्न दुधना प्रकल्पात प्रथमच ७३ टक्के जलसाठा झाल्यामुळे सेलू शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ३१ आॅगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दुधना प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाल्यामुळे सेलू शहराचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात केवळ ४१ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा ओघ वेगाने झाला. परिणामी ४ सप्टेंबर रोजी प्रकल्पात २५१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात १४८ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे. तीनच दिवसांत प्रकल्पाच्या पाणीपातळीत जवळपास दुपटीनेच वाढ झाली असल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचा आगामी काळात सिंचनासाठी देखील वापर होण्याची शक्यता होणार आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून शहराला मिळते. प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाल्यामुळे सेलू शहरवासिय सुखावले आहेत. प्रकल्पाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याची तयारी करण्यात आली आहे. आणखी पावसाळ्याचा एक महिना असल्यामुळे टप्याटप्याने पाणीसाठा करण्यात येत आहे. पाणीपातळीत झपाट्याने वाढनिम्न दुधना प्रकल्पाच्या निर्मितीनंतर प्रथमच ७३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही प्रकल्पात ६१ टक्के जलसाठा होता. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रकल्पात केवळ ४१ टक्के पाणी होते. परंतु, तीन दिवसांच्या पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी मिळण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान डाव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर उजव्या कालव्याचीही काही कि.मी. अंतराची पाणी सोडून चाचणीही झाली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.