संपामुळे ७०० कोटींची उलाढाल ठप्प

By Admin | Updated: September 3, 2015 00:28 IST2015-09-03T00:23:23+5:302015-09-03T00:28:34+5:30

लातूर : सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात विविध संघटनांनी लातुरात बुधवारी लाक्षणिक संप केला़ या संपात बँका, आयुर्विमा महामंडळ,

700 crore turnover jam due to strike | संपामुळे ७०० कोटींची उलाढाल ठप्प

संपामुळे ७०० कोटींची उलाढाल ठप्प



लातूर : सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात विविध संघटनांनी लातुरात बुधवारी लाक्षणिक संप केला़ या संपात बँका, आयुर्विमा महामंडळ, राज्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना , महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी, आदींनी सहभाग घेतला होता़ संपामुळे बँका बंद असल्याने ७०० कोटींची उलाढाल ठप्प झाली़
केंद्र शासनाच्या कामगार धोरणाच्या विरुद्ध कर्मचारी संघटना एकवटल्या असून, बँक कर्मचारी संघटनेने संसदेवरही मोर्चा काढला होता़ आता विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे़ बुधवारी झालेल्या संपात १० संघटना सहभागी झाल्या होत्या़ संपामुळे लातूर शहरातील तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार बंद होते़ परिणामी, बँकांतील सुमारे ७०० कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली़ संपात राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी़बी़ गायकवाड, व्यंकटेश हालिंगे, संजय कलशेट्टी उदय भावठाणकर, सुरेश नितळे, परिचारिका संघटनेच्या कार्याध्यक्ष अरुण कदम, अध्यक्ष प्रतिभा पवार, उपाध्यक्ष भीमराव चक्रे, सुमित्रा तोटे, दीपक सोळुंके, उनिता देशमाने, राम सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी यांचाही सहभाग होता़ मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले़ विश्वंभर भोसले, गोविंद निटूरे, सुभाष पाटील, व्ही़पीग़ायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती़ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना व राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या साडेचारशे कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयासमोर या दोन्ही संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली़ महाराष्ट्र औषध विक्री व वैद्यकीय प्रतिनिधींच्या वतीनेही आंबेडकर पार्क येथे निदर्शने करण्यात आली़ या आंदोलनात प्रा़डॉ़विठ्ठल मोरे, विश्वंभर भोसले व वैद्यकीय प्रतिनिधींचा समावेश होता़
शासनाच्या निषेधार्थ लातूर बँक आॅफ महाराष्ट्र पासून सर्व बँक कर्मचाऱ्यांनी मुकमोर्चा काढला़ मूकमोर्चा सुभाष चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, गुळ मार्केट येथून स्टेट बँक आॅफ हैद्राबाद येथे मोर्चाचा समारोप झाला़ मोर्चात धनंजय कुलकर्णी, प्रशांत धामणगावकर, उत्तम होळीकर, दिपक माने, बाळकृष्ण धायगुडे, सरस्वती हेड्डा, संजीवनी गोजमगुंडे आदी सहभागी झाले होते़ राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी संपात असल्यामुळे बुधवारी जिल्हाभरातील बँकांचे सुमारे ७०० कोटींची उलाढाल ठप्प होती, असे बँक कर्मचारी संघटनेचे उत्तम होळीकर यांनी सांगितले़

Web Title: 700 crore turnover jam due to strike