शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत ६३० आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:49 IST

गेल्या आठ महिन्यांत एकट्या मराठवाड्यात एक नाही, दोन नाही, तब्बल ६३० शेतकºयांनी आत्महत्या करून स्वत:ला संपवून टाकले.

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याला पडलेला शेतकरी आत्महत्यांचा विळखा कायम असून, आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाही. उलट त्यात भरच पडत चालली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील भयाचे वातावरण निवळता निवळत नाही. त्यातच शासकीय पातळीवर आत्महत्यांची नोंद घेण्यापलीकडे दुसरा असा ठोस कार्यक्रमही दिसत नाही. गेल्या आठ महिन्यांत एकट्या मराठवाड्यात एक नाही, दोन नाही, तब्बल ६३० शेतकºयांनी आत्महत्या करून स्वत:ला संपवून टाकले. कारणे अनेक असतील; परंतु बळीराजा स्वत:ला संपवून घेतोय, हे शिवाजी महाराजांच्या महाराष्टÑाला किती शोभनीय, हा प्रश्न शिल्लकउरतोच.महसूल यंत्रणेला या आत्महत्यांच्या संदर्भात विशेष काही कार्यक्रम आहे, असे दिसत नाही. त्याच पारंपरिक पद्धतीने नोंदणी करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, अटी व शर्तीत प्रकरण बसले तर पात्र ठरवणे या पलीकडे महसूल यंत्रणा वेगळे काही करताना दिसत नाही. यातही नकारात्मताच अधिक असल्याने जीव गमावून बसलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांना फार काही दिलासा मिळत नाही.आत्महत्यांचे सत्र एवढे वाढले आहे की, आता शेतकºयांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय न बनता जणू विविध तर्कवितर्कांचा विषय बनू लागला आहे. त्यामुळे जबाबदार नेत्यांकडून शेतकºयांच्या आत्महत्यांबद्दल अनुद्गार ऐकावयास मिळालेले आहेत.जानेवारी २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७ या कालावधीत मराठवाड्यात सुमारे ६३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे आठही जिल्ह्यांमध्ये या आत्महत्या झालेल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत १२७ शेतकºयांना आत्महत्या करावी लागली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात आत्महत्यांनी शंभरी गाठली आहे.उस्मानाबाद- ८६, औरंगाबाद-८४, परभणी- ८२, लातूर- ६०, जालना-५८, हिंगोली-३३ अशी आत्महत्यांची नोंदवली गेलेली आकडेवारी आहे. यापैकी आत्महत्यांची ४२५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरलेली आहेत. १०३ प्रकरणे अपात्र ठरलेली आहेत.जीव तर गेला; पण त्या शेतकºयांच्या कुटुंबाला दमडीचीही मदत मिळणार नाही, अशी ही १०३ प्रकरणे आहेत. आत्महत्या करून शेतकरी संपलेला असतो; पण त्याच्या आत्महत्येच्या चौकशी व्हायची असते. अशी १०२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.