शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’

By admin | Updated: July 27, 2014 01:17 IST

हिंगोली : आघाडी सरकारने मूळ वीजबिलाच्या ५० टक्के रक्कम भरून १०० टक्के बिल माफ करण्याची योजना जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळाली आहे.

हिंगोली : आघाडी सरकारने मूळ वीजबिलाच्या ५० टक्के रक्कम भरून १०० टक्के बिल माफ करण्याची योजना जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळाली आहे. शिवाय थकबाकीवरील व्याज आणि दंडही माफ केला जाणार असून एक किंवा तीन टप्प्यात ही रक्कम भरता येणार आहे.
जिल्ह्यात १ लाख ३९ हजार ६७७ महावितरणच्या ग्राहकांची संख्या आहे. त्यात कृषीपंपधारकांची संख्या ६० हजारांच्या घरात आहे. महावितरणच्या इतर ग्राहकांच्या तुलनेत कृषीपंपधारकांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. सध्या कृषीपंपाच्या एका युनिटसाठी महावितरणला २७ रूपये मोजावे लागतात; परंतु महावितरण शेतकऱ्यांना ६ रूपये प्रतियुनिट अशी दर आकारणी करते. एवढी कमी आकारणी असतानाही कृषीपंपधारकांनी नियमित विजबिले भरलेली नाहीत. परिणामी, मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याने गतवर्षी थकबाकीदारांची वीज तोडण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील कृषी उत्पादकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी या वीज तोडणीविरोधात नाराजी व्यक्त केल्याने जिल्ह्यातील वीज तोडणी थांबविण्यात आली. आता आगामी विधासभेची निवडणूक तोंडावर आल्याने उत्पादकांना खुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना नुकतीच जाहीर केली. प्रामुख्याने त्यात मूळ रकमेच्या ५० टक्के बिले भरून १०० टक्के वीज बिले माफ होणार आहेत. शिवाय शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत रक्कम भरण्याची सवलत देण्यात आली आहे. आजघडीला त्याचा लाभ जिल्ह्यातील ६० हजार कृषीपंपधारकांना होणार आहे. त्याचा लाभ हिंगोली तालुक्यातील १० हजार ५०० कृषीपंपधारकांना होणार असल्याचे अभियंता पी.एम. पाठक यांनी सांगितले. बागायती शेतीचे प्रमाण अधिक असल्याने वसमत तालुक्यात कृषीपंपधारकांची संख्या २० हजारांच्या घरात आहे. त्यानंतर कळमनुरी तालुक्यात १० हजार ८७८ ग्राहकांकडे २४ कोटी रूपयांची थकबाकी आहे. सेनगाव तालुक्यात १० हजार ५९३ कृषीपंपधारकांकडे २६ कोटी २४ लाख रूपयांची थकबाकी आहे; मात्र त्यात मार्चअखेर २६ कोटी २४ लाखांची मूळ थकबाकी आहे; परंतु नियमित बिले भरली नसल्याने उत्पादकांना २२ कोटी ११ लाख रूपयांचे व्याज आणि ५२ लाख रूपयांचा दंड लागला. परिणामी, ४८ कोटी ८८ लाख रूपयांवर बिलाची रक्कम गेली. मात्र संजीवनी योजनेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ कोटी २४ लाख रूपये भरले तर व्याज आणि दंड माफ होणार असल्याचे सेनगावचे अभियंता अनिल जीवनानी यांनी सांगितले.
औंढा नागनाथ तालुक्यात कृषीपंपधारकांची संख्या १० हजार एवढी आहे. जिल्ह्यातील पाच उपविभागातील कृषीपंपधारकांकडे एकूण २८२ कोटींची थकबाकी आहे. मुळात बिलांची रक्कम कमी असून व्याज आणि दंडामुळे एकूण थकबाकीचा आकडा फुगला; परंतु प्रतिवर्षीची जिल्ह्याची उत्पादकता पाहता २८२ कोटींची रक्कम डोईजड झाली होती. आता संजीवनी योजनेमुळे कृषीपंपधारकांना एकूण बिलाच्या ५० टक्के बिल भरावयाचे आहे. प्रामुख्याने त्यानुसार जिल्ह्यात ७० कोटी रूपयांची रक्कम भरल्यास २८२ कोटींची थकबाकी माफ होणार आहे. शिवाय उत्पादकांना तीन हप्त्यांत रक्कम भरता येणार आहे. पहिला हप्ता आॅगस्टअखेरपर्यंत भरता येणार आहे. उर्वरित दोन्ही हप्त्यांसाठी ३० सप्टेंबर आणि ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंतची मुदत आहे. उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन हिंगोलीचे अधीक्षक अभियंता एच.के. रणदिवे यांनी केले आहे.या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महावितरणची वीजबिल वसुली होण्यास मदत होत आहे. आगामी काळात आणखी शेतकरी लाभ घेतील, अशी महावितरणला अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात महावितरणच्या १ लाख ३९ हजार ६७७ पैकी ६० हजारांच्या आसपास आहेत कृषीपंपधारक
कृषीपंपाच्या एका युनिटसाठी महावितरणला २७ रूपये मोजावे लागतात; परंतु शेतकऱ्यांकडून महावितरण ६ रूपये दराने एका युनिटची आकारणी करते.
आता आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने उत्पादकांना खुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने केली कृषी संजीवनी योजना जाहीर
योजनेत मूळ रकमेच्या ५० टक्के बिले भरून १०० टक्के वीजबिले माफ होणार असून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात रक्कम भरण्याची देण्यात आली सवलत.
कळमनुरी तालुक्यात १० हजार ८७८ ग्राहकांकडे २४ कोटी रूपयांची थकबाकी असल्याने तेथील कृषीपंपधारकांना होणार लाभ.
सेनगाव तालुक्यात २२ कोटी ११ लाख रूपयांचे व्याज आणि ५२ लाख रूपयांचा दंड लागल्याने ४८ कोटी ८८ लाखांवर गेले वीजबिल.