शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात महापालिकेचे ६ फिरते शौचालय !

By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST

लातूर : लातूर शहर महागनरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे़ सर्वाधिक वर्दळ असलेल्या बाजारपेठेतील ठिकाणे, प्रमुख चौकांत

लातूर : लातूर शहर महागनरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे़ सर्वाधिक वर्दळ असलेल्या बाजारपेठेतील ठिकाणे, प्रमुख चौकांत शौचालय उभारण्याची मागणी आहे़ परंतू, मनपा प्रशासनाला प्रमुख ठिकाणी जागा मिळत नसल्याने हे काम रखडले असतानाच ६ फिरत्या सार्वजनिक शौचालयासाठी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत आलेल्या निविदेला नेहमीप्रमाणे मंजुरी दिली आहे़ विशेष म्हणजे ज्या कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्यात आली तो कंत्राटदार काळ्या यादीत असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला़स्थायी समितीने गेल्या पंधरा दिवसांत विविध कामांसाठी आलेल्या निविदांना तात्काळ मंजुरी देत कार्यारंभाचे आदेश दिले आहेत़ घाई-घाईत होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकींचा अजेंडाही अचानकपणे आणला जात आहे़ सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत मुलभूत सेवा व सुविधा या घटकांतर्गत लातूर शहरात ६ फिरते खरदी करण्यासाठी ३१ लाख ५० हजार रूपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती़ त्यानुसार शौलचाय खरेदीची निविदा आॅनलाईन मागविण्यात आल्या होत्या़ त्यात नाशिक येथील एस़एस़एन्टरप्रायझेसने प्रति नग ५ लाख २ हजार २००, साई इंडस्ट्रिज ६ लाख ४६ हजार व मिरज येथील न्यू साई फायबर यांनी ८ लाख ८२ हजाराप्रमाणे निविदा भरली होती़ कमी दरात असलेली एस़एस़एन्टरप्रायझेस यांच्या निविदेला मंजुरी देण्यासाठी स्थायी बैठकीत आयुक्तांनी प्रस्ताव दिला़ दर कमी असल्याने ६ नग खरेदीत मनपाचे जवळपास ८ लाख ६२ हजार ८०० रूपये वाचणार असल्याने स्थायी समितीने नाशिकच्या एस़एस़एन्टरप्रायझेस कंपनीची निविदा मंजूर केली़ सभापती अख्तर मिस्त्री, आयुक्त सुधाकर तेलंग यांच्यासह सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ काळ्या यादीतला कंत्राटदाऱ़़़ज्या कंत्राटराच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, तो कंत्राटदार तुळजापूर नगरपालिकेने काळ्या यादीत टाकला असल्याचे पत्र मनपाला मिळाले होते़ काळ्या यादीत नाव असलेल्या कंत्राटदाराची निविदा मंजूर कशी करता, असा सवाल शिवसेनेचे रवी सुडे बैठकीत केला़ त्यावर आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात आली़ तुळजापूर पालिकेने तसा ठराव मांडला होता परंतू त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले नसल्याचे चौकशीत उघड झाल्याचे स्पष्टीकरण दिले़ मात्र, त्यांच्या कामाचा दर्जा योग्य आढळला नाही़ ही वस्तुस्थिती लक्षा घेता त्यांच्याकडून प्रति नग १० टक्के सुरक्षा अनामतीऐवजी २५ टक्के भरून घेतल्यावर पुरवठा आदेश देण्यात येईल, असे सांगितले़ प्रारंभी १ शौचालय खरेदी करण्यात यावे़ त्याचा दर्जा चांगला आढळून आल्यास इतर ५ नग मागविण्यात यावेत, असे शैलेश स्वामी यांनी सांगितले़ खरेदी करण्यात आलेल्या शौचालयाचा दर्जा शासकीय तंत्रनिकेतन, लातूर यांच्याकडून तपासून घेण्यात येणार असल्याचा खुलासा प्रशानाने केला़ सहापैकी २ शौचालय महिलांसाठी व ४ पुरूषांसाठी ठेवावेत अशा सूचना डॉ़ रूपाली सोळुंके यांनी मांडल्या़ फिरत्या शौचालयासाठी ३१ लाख ५० हजार रूपयांच्या प्रस्तावास १ मार्च २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती़ तब्बल पाच महिन्यानंतर मनपा प्रशासनाने निविदा काढून स्थायी समितीच्या बैठकीत निविदेला मंजुरी मिळवून घेतली आहे़