शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
4
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
5
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
6
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
7
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
8
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
9
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
10
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
11
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
12
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
13
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
14
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
15
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
16
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
17
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
18
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
19
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
20
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
Daily Top 2Weekly Top 5

५५ टक्के महिला अ‍ॅनिमियाने त्रस्त

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

माधवी वाकोडकर, औरंगाबाद औरंगाबाद शहरातील ५५ टक्के महिला अ‍ॅनिमियाने (रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) त्रस्त आहेत.

माधवी वाकोडकर, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील ५५ टक्के महिला अ‍ॅनिमियाने (रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) त्रस्त आहेत. महिलांच्या तुलनेत ३० टक्के पुरुष अ‍ॅनिमियाने त्रस्त आहेत.
सामाजिक आणि रोगप्रतिबंधक औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे येथे करण्यात आलेल्या सर्व्हेत ही आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याच वेळी त्यांची आरोग्यासंबंधीची माहिती फॉर्मद्वारे भरून घेण्यात आली. या माहितीत खाण्याच्या सवयी, नाश्ता घेता का? जंकफूडचे प्रमाण किती? शारीरिक तक्रारींचा समावेश होता. या माहितीवरून नागरिकांचे खाण्याकडे होणारे दुर्लक्ष उघड झाले. शहरातील ५५ टक्के महिलांना रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असण्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे म्हणजेच अ‍ॅनिमिया होणे. अ‍ॅनिमियाग्रस्त महिला व मुलींचे प्रमाण जास्त आहे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत मुलींची होणारी गैरसोय, तसेच जंकफूडकडे वाढत असलेला कल यामुळे हा आजार होतो.
अ‍ॅनिमिया का होतो?
मासिक पाळीतील रक्तस्राव, मूळव्याध, रक्तस्राव वाढणारे आजार
आजार अंगावर काढणे
आहारात लोह व प्रथिनांचे प्रमाण कमी
सकस आहाराचे कमी प्रमाण
लक्षणे -
थकवा येणे, दम लागणे, चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे
हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे?
नॉर्मल राहण्यासाठी स्त्रियांना १२.५, पुरुषांना १३ ग्रॅम, तर गरोदर मातांना ११ ग्रॅम हिमोग्लोबिनची आवश्यकता असते.
स्त्री-पुरुष समानता असावी
बऱ्याच कुटुंबांमध्ये पुरुषांचे जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न महिलांनी खाण्याची पद्धती रूढ आहे. कुटुंबातील स्त्री स्वत:च्या आरोग्याची उपेक्षा करून कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेते. हे टाळण्यासाठी प्रत्येक घरात स्त्री व पुरुष यांचा दर्जा समान असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयीन मुलींमध्ये लठ्ठपणा वाढेल या धास्तीमुळे नियमित खाण्याकडे होणारे दुर्लक्ष कमी व्हायला हवे. शरीर सुदृढ असेल तर ध्येय गाठणे शक्य होते. त्यामुळे लठ्ठपणा वाढू नये यासाठी सकस आहार न घेता जंकफूडला पसंती देणे चुकीचे आहे.
- डॉ. जगन्नाथ दीक्षित, प्रमुख, सामाजिक व रोगप्रतिबंधक औषध वैद्यकशास्त्र विभाग, घाटी रुग्णालय
आहार कोणता घ्यावा?
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ नये, तसेच ते नियंत्रणात ठेवता यावे यासाठी लोह तसेच प्रथिनेयुक्त आहाराची गरज असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य, डाळी, सुकामेवा, गूळ, फळे, टरबूज यांचा प्रामुख्याने समावेश असावा.
शाकाहरी व्यक्तीला अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी दूध आणि लोहयुक्त पदार्थांशिवाय दुसरा पर्याय नाही. मांसाहारी व्यक्तीने मासे, मटन, चिकन, अंडी यांचा वापर नियमित करावा.