५१ दिवसांचा चारा उपलब्ध

By Admin | Updated: September 29, 2015 00:46 IST2015-09-29T00:26:29+5:302015-09-29T00:46:25+5:30

बीड : जिल्ह्यात ५१ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. त्यामुळे आता नवीन छावण्यांना मंजुरी दिली

51-day fodder available | ५१ दिवसांचा चारा उपलब्ध

५१ दिवसांचा चारा उपलब्ध


बीड : जिल्ह्यात ५१ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. त्यामुळे आता नवीन छावण्यांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी स्पष्ट केले.
जिल्ह्यात लहान-मोठया जनावरांची संख्या ८ लाख २२ हजार ३६४ असून जनावरांना दररोज ७ हजार ८८२ मे. टन चारा लागतो. खरीप हंगामात इतर मार्गानी जिल्हयात ४ लाख ४ हजार ९२२ मे. टन चारा उपलब्ध असून, हा चारा जिल्हयातील जनावरांना ५१ दिवस पुरेल इतका आहे.
चारा छावण्या सुरु करण्याच्या निर्णयानूसार ५० चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी ४ छावण्या सुरु आहेत. त्यापैकी निकषाप्रमाणे ३ छावण्या सुरु असून सुरु होऊन बंद झालेल्या छावण्यांची संख्या ६ आहे. यामुळे चारा छावण्यांची गरज नसल्याचे निदर्शनास आल्यानुसार प्रशासनाने नवीन चारा छावण्या मंजूर न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 51-day fodder available