शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

५०० शिक्षक धडकले जिल्हा परिषदेवर

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

बीड : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा शासननिर्णय मागे घ्यावा, अतिरिक्त शिक्षक वर्षभरपासून वेतनाविना आहेत

बीड : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा शासननिर्णय मागे घ्यावा, अतिरिक्त शिक्षक वर्षभरपासून वेतनाविना आहेत. त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पहावे या मागणीसाठी पाचशेवर शिक्षक सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेवर धडकले.जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त नसतानाही ९२६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीद्वारे बीडमध्ये आले. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा आकडा हजाराच्या घरात गेला. सेवाज्येष्ठता, बिंदूमनामावली यास फाटा देत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करुन मूळ ठिकाणी पाठवावे असे आदेश गुरुवारी राज्याच्या शिक्षण विभागाने काढले होते.सोमवारी पाचशेवर शिक्षक कन्या शाळेतील जि.प. शिक्षण विभागात दाखल झाले. तेथे कार्यमुक्तीचा आदेश मागे घेण्यासाठी काय- काय करता येईल? यावर सविस्तर चर्चा झाली. शासनादेश मागे घ्यावा, या मागणीसाठी ५०० शिक्षकांचा जमाव कन्या शाळेतून जिल्हा परिषदेत पायी आला. शहर ठाण्याचे निरीक्षक मारुती पंडित हे फौजफाट्यासह तेथे पाहोचले. त्यांनी शिक्षकांना दालनाबाहेर काढले. जमाव पाहता दंगलनियंत्रण पथकालाही पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी सीईओंना भेटण्यासाठी शिक्षकांच्या शिष्टमंडळास परवानगी दिली. प्रत्येक तालुक्यातील एक असे ११ शिक्षक ननावरे यांना भेटले.पाठपुरावा सुरुसीईओ नामदेव ननावरे यांनी शिष्टमंडळास सांगितले की, हा प्रश्न मंत्रालयीन स्तरावरील आहे. आज शिक्षक संघटनेसोबत शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली, मात्र त्या काय झाले ? हे सांगता येणार नाही. शिक्षकांबद्दल सहानुभूती आहे; परंतु शासनाच्या सूचनेप्रमाणेच काम करावे लागेल. प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)५०० शिक्षकांचा जत्था जि.प. वर धडकला मात्र, या शिक्षकांनी कुठल्याही शिक्षक संघटनेचा आधार घेतला नाही. एकत्रितपणे सर्वजण शांततेत आले होते. सीईओंना दिलेल्या निवेदनात मंगळवारपासून कुटुंबियांसमवेत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, सीईओ ननावरे यांनी शिक्षकांची बाजू ऐकून घेत त्यांना शांत केले. त्यानंतर शिक्षकांनी नमते घेतले अन् काही वेळेतच मंगळवारी आंदोलन करणार नाहीत, असे लेखी दिले.शिक्षकांनी खचू नये४जि. प. शिक्षण सभापती बजरंग सोनवणे म्हणाले, अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही. संचमान्यता, समायोजन, पदोन्नती प्रक्रिया राबवून प्रश्न मार्गी लावू. शिक्षकांनी खचून जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.