शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
4
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
5
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
6
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
7
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
8
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
9
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
10
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
11
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
12
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
13
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
14
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
15
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
16
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
17
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
18
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
19
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
20
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
Daily Top 2Weekly Top 5

धरपकड मोहिमेत ५० जण ताब्यात

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

औरंगाबाद : आगामी विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापुरुष तसेच देवदेवतांची विटंबना करण्याचा हा काही जणांचा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.

औरंगाबाद : आगामी विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापुरुष तसेच देवदेवतांची विटंबना करण्याचा हा काही जणांचा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.
फेसबुक, व्हॉटस्अप, टिष्ट्वटर, यू-ट्यूब यासारख्या सोशल मीडियाबाबत आता नागरिक जागरूक झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवून शहरातील शांततेला गालबोट लावण्याचे समाजकंटकांचे षड्यंत्र नागरिक ओळखून आहेत. परिणामी, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी आगामी काळात सोशल मीडियाशिवाय अन्य कोणत्या तरी दुसऱ्या माध्यमातून विटंबनेची मोठी घटना करून शहरात जातीय तणाव निर्माण केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने शहरात पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आपल्या हद्दीतील सर्व पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.
समाजकंटकांचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी नागरिकांना शहरात संयम राखण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेटवरून विटंबनेचे प्रकार केले जात आहेत. त्याचे मूळ शोधणे अवघड असले तरी समाजकंटकांचा हेतू काय आहे, तो आपण ओळखला पाहिजे. प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणेच समाजहितासाठी योग्य राहील, असे ते म्हणाले.
फेसबुकवर महापुरुषांचे बदनामीकारक चित्र व मजकूर प्रसारित केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरात दगडफेक व बळजबरीने दुकाने बंद करण्याचे प्रयत्न झाले. शहरातील अनेक भागांत पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून बंदोबस्त लावला होता.
सलग दोन दिवस पोलिसांनी खडा पहारा देऊन गडबड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली. तरीही काल रविवारी दिवसभर विविध भागांत कार्यकर्ते रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करीत होते. संपूर्ण शहरात अफवांचे पेव फुटले होते. काल रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पंचवटी चौकात वाहनांवर दगडफेकही झाली. पोलिसांनी विविध भागांतून गोंधळ घालणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
फेसबुकवर महापुरुषांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शहर व परिसरातील वातावरण बिघडविणाऱ्या ५० पेक्षा जास्त तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिली.
दरम्यान, आज सोमवारी छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभाळा येथील एक घटना वगळता शहरात सर्वत्र शांतता होती. जांभाळा येथे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार उधळून लावला. गावातील दुकाने बळजबरीने बंद केली.
या प्रकरणी छावणी पोलिसांनी घटनास्थळी वेळीच पोहोचून ७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.