शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

आखाड्यास आग लागून ५ लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

कापडसिंगी : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील शेतवस्तीवरील आखाड्यास अचानक आग लागल्याने जवळपास ५ लाखांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली.

कापडसिंगी : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील शेतवस्तीवरील आखाड्यास अचानक आग लागल्याने जवळपास ५ लाखांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. कापडसिंगी येथील गट क्र. २६७ मध्ये शेकुराव काळे, शिवाजी आश्रुजी काळे यांचा आखाडा आहे. नेहमी प्रमाणे सकाळीच काम आटोपून ते शेतात भूईमुग काढण्यासाठी गेले होते. दुपारी अचानक आग लागल्याचे दिसल्याने त्यांच्या मुलाने आरडा-ओरड करून शेजार्‍यांना बोलावले पण तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. शेतातील शेतकर्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण हवेचे प्रमाण जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. या आखाड्यावर एक बैल व म्हैस बांधलेली होती. संपूर्ण आखाड्यास आगीने वेढल्यामुळे ग्रामस्थांना आग विझविण्यात अपयश आले. यामध्ये एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला तर म्हैस गंभीर जखमी झाली. यामध्ये त्यांचे गहू, ज्वारी, हरभरा, बि-बियाणे, खते शेतीपयोगी अवजारे, इंजीन, मोटार, केबल, पाईप, सायकल याच्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर शेकुराव आश्रुजी काळे व शिवाजी आश्रुजी काळे या दोघा भावाच्या आखाड्यास आग लागुन ५ लाखांच्यावर नुकसान झाले. ही आग शॉटसर्किटने लागल्याचा अंदाज आहे. यावेळी शेतकर्‍यांनी पाईपने पाणी मारून आग विझविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. याबाबतची महसूल विभागाला माहिती देताच तलाठी अनिल गवई, डॉ. अनिल देशमुख, पोहेकाँ जाधव यांनी पंचनामा केला. डॉ. एस.यु. माळोदे, डॉ. कचरे, जि.प. सदस्य चंद्रकांत हराळ, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत यांनी घटनास्थळास भेट दिली. (वार्ताहर)