उस्मानाबाद : जिल्ह्यातील आमदारांनी स्थानिक विकास निधीतून २०१४-१५ या वर्षात घ्यावयाच्या विविध कामांसाठी ५ कोटी ४३ लाख ४४ हजार इतक्या रक्कमेची शिफारसपत्रे दिली आहेत. मात्र यातील ४ कोटी ७२ लाख ९५ हजाराच्या कामांचे अंदाजपत्रक सादर झालेले नसल्याने अवघ्या ७० लाख ४९ हजार रुपयांच्या कामांनाच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्यास निधी उपलब्ध असूनही मोठ्या प्रमाणात कामे रखडण्याची भीती आहे.विशाल सोनटक्के ल्ल उस्मानाबाद२०१३-१४ या वर्षासाठी प्रत्येक आमदाराला २ कोटीचा निधी अनुज्ञेय आहे. आ. राहुल मोटे यांच्यासाठी २०१४ मधील कामांसाठी १ कोटी ४० लाख ९५ हजार उपलब्ध वाव असताना अद्यापपर्यंत २१ लाख १३ हजार एवढ्या रक्कमेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मोटे यांनी बांधकाम विभागांतर्गत १२ कामे, जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्गत ३, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ४, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अंतर्गत ३ तर जिल्हा नियोजन अधिकारी अंतर्गत १ काम प्रस्तावित केले आहे.आ. ज्ञानराज चौगुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत २९ कामे तर जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयांतर्गत ४ कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांची एकूण रक्कम १ कोटी ३३ लाख ५० हजार एवढी असताना उर्वरित कामांची अंदाजपत्रके अप्राप्त असल्याने केवळ ५ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ. ओम राजेनिंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत १५ कामे, बांधकाम विभागांतर्गत १४, उस्मानाबाद पालिका व कळंब नगरपालिके अंतर्गत प्रत्येकी १ काम, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांतर्गत २, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांतर्गत ३, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ६ तर लघु पाटबंधारे विभागांतर्गत एका कामाची शिफारस केली आहे. या कामांची एकूण रक्कम १ कोटी ६५ लाख ५० हजार एवढी असताना अंदाजपत्रके अप्राप्त असल्याने २४ लाख ८६ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत २३ कामे, नळदुर्ग पालिके अंतर्गत १ तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत एका कामाची शिफारस केली आहे. या सर्व कामांची अंदाजित किंमत १ कोटी ३३ लाख रुपये आहे. त्यातील १९ लाख ५० हजार रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.बांधकामाला प्राधान्य जिल्ह््यातील चारही आमदारांच्या ५ कोटी ४३ लाख ४४ हजाराच्या अंदाजित किमतीच्या कामात बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या कामांना सर्वच आमदारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. आ. राहुल मोटे यांनी बांधकाम विभागांतर्गत १२ कामांची शिफारस केली आहे. आ. ज्ञानराज चौगुले यांनी २९, आ. ओम राजेनिंबाळकर यांनी १५ तर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या आमदार निधीतून २३ कामांची शिफारस केली आहे. एकूणच जिल्ह्यातील चारही आमदारांनी सर्वाधिक म्हणजे ७९ कामे ही बांधकाम विभागांतर्गत सुचविली असून, यामध्ये सभागृह, व्यायामशाळा, रस्ता सुधारणा तसेच स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे आदींचा यामध्ये समावेश आहे. बांधकामांना आमदारांचे प्राधान्य असताना पाणी पुरवठा संदर्भातील कामांची संख्या मात्र बांधकामाच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील आमदारांनी पाणीपुरवठा योजना, विंधन विहीर, हातपंप तसेच सबमर्सिबलपंप बसविण्यासाठी अवघ्या १२ कामांची शिफारस केली आहे. यामध्ये आ.राहुल मोटे यांनी ३ कामांची शिफारस केली असून, आ. ओम राजेनिंबाळकर यांनी ८ तर मधुकरराव चव्हाण यांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात एक काम सुचविलेले आहे. चौगुले यांच्या शिफारसीमध्ये पाणीपुरवठा संदर्भातील एकही काम नाही.
५ कोटी ४३ लाखांची कामे रखडण्याची भीती !
By admin | Updated: July 26, 2014 00:41 IST
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आमदारांनी स्थानिक विकास निधीतून २०१४-१५ या वर्षात घ्यावयाच्या विविध कामांसाठी ५ कोटी ४३ लाख ४४ हजार इतक्या रक्कमेची शिफारसपत्रे दिली आहेत.
५ कोटी ४३ लाखांची कामे रखडण्याची भीती !
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}