उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेली बदली प्रक्रिया अखेर गुरूवारी अखेर झाली झाली आहे़ पोलिस मुख्यालयात असलेल्या तब्बल २७७ कर्मचाऱ्यांना विविध ठाण्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत़ उमरगा ठाण्यातील १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्या ठिकाणी जिल्ह्यात सर्वाधिक ५४ कर्मचारी देण्यात आले आहेत़लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेली बदली प्रक्रियेचे आदेश औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या मान्यतेनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी काढले आहेत़ यात ४१ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ९६ पोलिस हवालदार, ९१ पोलिस नाईक व १७८ पोलिस शिपाई अशा ४०६ जणांचा समावेश आहे़ (कंसात बदली झालेलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या) शहर पोलिस ठाण्यात (०७) बदलून आलेले २४, ग्रामीण पोलिस ठाण्यात (०६) १९, बेंबळी ठाण्यात (०६) ०६, ढोकी पोलिस ठाण्यात (०५), तुळजापूर पोलिस ठाण्यात २३ (०५), नळदुर्ग पोलिस ठाण्यात (०७) २१ , तामलवाडी पोलिस ठाण्यात (०६) १७, लोहारा पोलिस ठाण्यात (०५) १९, उमरगा पोलिस ठाण्यात (१५) ५४, मुरूम पोलिस ठाण्यात (०९) २८, कळंब पोलिस ठाण्यात (११) ४०, शिराढोण पोलिस ठाण्यात (०६) ०४, परंडा पोलिस ठाण्यात (०२) १८, अंबी पोलिस ठाण्यात (०६) १५, भूम पोलिस ठाण्यात (०७) २२, वाशी पोलिस ठाण्यात (०४) ११, येरमाळा पोलिस ठाण्यात (०५) ०४, श्री तुळजाभवानी मंदिर चौकीत (०३) २५, जिविशा मध्ये (०२) ०२, पोलिस मुख्यालयात (२७७) १२, स्थानिक गुन्हे शाखेत (०२) ०३, महिला तक्रार निवारण केंद्रात १, एमटी मध्ये दोन, वाहतूक शाखेत (०५) १२, म़ पो़ कुटुंब आरोग्य योजनेसाठी एक कर्मचारी बदली होऊन आला आहे़ सर्वच पोलिस ठाण्याला वाढीव कर्मचारी मिळाले असून, त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांसमोरील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी वाढल्याचे सदरील बदल्यांवरून दिसते.अधिकाऱ्यांच्या कधी?जवळपास दोन महिन्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया झाली आहे़ त्याबरोबर अधिकाऱ्यांच्या बदलीचेही आदेश निघतील, अशी आशा अनेक अधिकाऱ्यांना होती़ मात्र, अद्यापपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत़ काही अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात ठाणे देण्यात आले असून, अनेक अधिकारी मुख्यालयात कार्यरत आहेत़ त्यामुळे ठाण्यातील अधिकाऱ्यांची गरज पाहता, अधिकाऱ्यांच्याही तत्काळ बदल्या होण्याची आवश्यकता आहे़
जिल्ह्यातील ४०६ पोलिसांच्या बदल्या
By admin | Updated: July 26, 2014 00:41 IST
उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेली बदली प्रक्रिया अखेर गुरूवारी अखेर झाली झाली आहे़
जिल्ह्यातील ४०६ पोलिसांच्या बदल्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}