शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख कोटी टॅक्स प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : देशात टॅक्सशी संबंधित चार लाख कोटी टॅक्स प्रकरणे प्रलंबित असून, हे तंटे सोडविणे केंद्र शासनाला आव्हानात्मक आहे.

औरंगाबाद : देशात टॅक्सशी संबंधित चार लाख कोटी टॅक्स प्रकरणे प्रलंबित असून, हे तंटे सोडविणे केंद्र शासनाला आव्हानात्मक आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये तंटा निवारण केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सी.ए. नितीन विजयवर्गीय यांनी दिली. चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआय) आणि कंपनी सेक्रेटरीज आॅफ इंडिया (आयसीएस आय) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सीएमआय हॉल येथे ‘युनियन बजेट-२०१४-१५’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्थसंकल्पाच्या वेगवेगळ्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सी.ए. दिनेश खटोड यांनी टॅक्सचा सर्वसामान्यांसह उद्योगांवर होणारा थेट प्रभाव या मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. नितीन विजयवर्गीय यांनी नमूद केले की, यंदाचा अर्थसंकल्प खूप चांगला होता. टॅक्सचे वेगवेगळे स्लॅब ठरविण्यात आल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्योगांसाठी अर्थसंकल्प चांगला म्हणावा लागेल. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला याचा फायदा होईल. भारतात गुंतवणूकदारांनी आपला पैसा कोणाच्या भरोशावर लावायचा. आपण लावलेला पैसा परत मिळेल, अशी खात्री त्यांना हवी असते. यंदाच्या अर्थसंकल्पात अशा प्रकारचा एक आशेचा किरण दिसून येतोय. विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे दिसून येते.तत्पूर्वी, सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा, आशिष गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आशिष गर्दे, रितेश मिश्रा, रूपेश खोकले, सारिका कौशिक आदींची उपस्थिती होती.प्रक्रिया पूर्णतेसाठी १ वर्ष लागेल राहुल मेहता यांनी सांगितले की, येणाऱ्या दोन ते तीन वर्षांमध्ये अर्थसंकल्पाचे फायदे उद्योगांना दिसायला लागतील. चीनमध्ये गुंतवणूकदार का आकर्षित होत आहेत, याची कारणे केंद्र शासनाने शोधून काढली आहेत. भारतात गुंतवणूक केल्यास आपण डबघाईला येणार नाही, अशी हमी अर्थसंकल्पातील योजनांवर दिसून येते.केंद्राने जीएसटीप्रणालीसाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. ही प्रणाली लागू करण्यासाठी सरकारला राज्यसभा आणि लोकसभेत कायद्यात बदल करावा लागेल. दोन्ही ठिकाणी सरकारला बहुमताची गरज पडेल. जीएसटीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष तरी लागेल, असे मेहता यांनी नमूद केले.