४ कोटी ८५ लाखांचे वाटप

By Admin | Updated: June 11, 2014 00:27 IST2014-06-10T23:52:33+5:302014-06-11T00:27:39+5:30

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील २१ गावांना गारपीट अनुदानाची प्रतीक्षा लागली होती़ याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्तांकनही केले होते़

4 crore 85 lakhs distributed | ४ कोटी ८५ लाखांचे वाटप

४ कोटी ८५ लाखांचे वाटप

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील २१ गावांना गारपीट अनुदानाची प्रतीक्षा लागली होती़ याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्तांकनही केले होते़ त्याची दखल घेऊन तहसील कार्यालयाने ९ जून रोजी १९ गावांना ४ कोटी ८५ लाख ९९ हजारांचा दुसरा हप्ता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे़ त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीपुर्वीच मदतीचा हप्ता बँकेत जमा झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ शिवाय, ‘लोकमत’च्या पाठपुराव्याबद्दल आभार मानण्यात येत आहेत़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मार्च महिन्यात सलग १८ दिवस झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते़ या गारपिटीचा फटका संपूर्ण ४८ गावांना बसला होता़ परंतु, पहिल्या टप्प्यात २७ गावांना ५ कोटी ११ लाख रूपयांचे वाटप झाले आणि उर्वरित २१ गावांना अनुदानाची प्रतीक्षा लागली़ यादरम्यान ‘लोकमत’ने २१ गावांना गारपीट मदतीची प्रतीक्षा असे वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन सोमवारी १९ गावांतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ४ कोटी ८५ लाख ९९ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले़ (वार्ताहर)
दोन गावांना अनुदानाची प्रतीक्षा़़़
तालुक्यातील ४८ पैैकी ४६ गावांना आजपर्यंत १० कोटी ८ लाख ९६ हजार रूपयांचे वाटप झाले असून, अद्यापि, येरोळ आणि वांजरखेडा या दोन मोठ्या गावांना मदतीची पुन्हा प्रतिक्षा लागली आहे़
चार दिवसांत वाटप़़़
याबाबत तहसीलदार वसंत पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उर्वरित दोन गावांना चार दिवसांत मदतीचे वाटप केले जाईल़

Web Title: 4 crore 85 lakhs distributed