शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

३५ गावांना दूषित पाणी; ब्लिचिंग पावडरच नाही

By admin | Updated: June 25, 2014 01:27 IST

औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याचा धोका असला, तरी अनेक ग्रामपंचायती याविषयी गंभीर नाहीत.

औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याचा धोका असला, तरी अनेक ग्रामपंचायती याविषयी गंभीर नाहीत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींकडे पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारे ब्लिचिंग पावडरही उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पंचायतराज व्यवस्थेत गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी नियमितपणे ब्लिचिंग पावडरचा वापर करणे अपेक्षित असते. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडरचा वापर न करताच नागरिकांना पाणी पुरवीत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे नुकतीच ब्लिचिंग पावडरच्या उपलब्धतेची तपासणी करण्यात आली. तेव्हा जिल्ह्यातील ८५८ ग्रामपंचायतींपैकी ८२१ ग्रामपंचायतींकडे हा साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. उर्वरित ३५ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरचा साठा शिल्लक नाही. त्यामुळे संबंधित गावांमध्ये नागरिकांना शुद्धीकरणाच्या प्रक्रियेशिवायच पाणी पुरविले जात आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १५ गावांमध्ये ब्लिचिंग पावडर नाही. (लोकमत ब्युरो)ब्लिचिंग पावडर नसलेल्या ग्रामपंचायती औरंगाबाद४कन्नड१वैजापूर१५खुलताबाद११सिल्लोड०गंगापूर०पैठण३सोयगाव१ फुलंब्री ०एकूण३५