शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित ३०५ चिमुकले ठणठणीत

By admin | Updated: June 13, 2014 00:37 IST

विठ्ठल फुलारी , भोकर राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभियानात भोकर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला चांगलेच यश आले आहे़

विठ्ठल फुलारी , भोकरराजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभियानात भोकर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला चांगलेच यश आले आहे़ या अभियानात ३०५ कुपोषित चिमुकल्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणत हे चिमुकले ठणठणीत झाले आहेत़भोकर तालुक्यातील ११ हजार ४३२ बालके अंगणवाडीच्या संपर्कात आहेत़ यांना पोषण आहार देण्यातही येतो़ राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान राबविण्याच्या १४ नोव्हेंबर २०१३ पूर्वी तालुक्यात कमी वजन असलेले ६५३ तर तीव्र कमी वजन असलेले १४६ बालके होती़ ७ एप्रिलपर्यंत राबविण्यात आलेल्या या अभियानात अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले़ यामुळे कमी वजन असलेल्या २४२ व तीव्र कमी वजन असलेल्या ६३ बालकांत सुधारणा होवून ते सर्वसाधारण श्रेणीत येत ठणठणीत झाले आहेत़ आजघडीला तालुक्यात अजूनही कमी वजन असलेले ४११ तर तीव्र कमी वजन असलेले ८३ बालके असे ४९४ बालके कुपोषित आहेत़ याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून दुसरी मोहीम हाती घेण्यात येणार आहे़ कुपोषणमुक्तीचे कामे असेच गतिमान राहिल्यास येणाऱ्या काही महिन्यात भोकर तालुका कुपोषणमुक्त होणार आहे़अंगणवाड्यांचे बांधकाम अर्धवटतालुक्यातील भोसी येथील दोन, नेरली, मालदरी, किनी, मोखंडीतांडा, डोरलीतांडा येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट आहे़ सिंगारवाडी, बाचोटीकॅम्प, अमरूनाईक तांडा येथील अंगणवाडीच्या शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहे़ तर बोरगाव, सोमठाणा, सोमठाणातांडा, दिवशी बु़, दिवशी खु़, रायखोड व सावरगाव मेट येथील अंगणवाडी बांधकामाल निधी असूनही बांधकामाला अद्यापपर्यंत सुरुवात झाली नाही़ आयएसओसाठी प्रयत्नभोकर तालुक्यातील लामकाणी, हळदा, मोघाळी, जामदारी, जामदरी तांडा, सावरगाव माळ, देवठाणा तांडा, पांडुरणा, किनी व दिवशी बु़ येथील अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत़ यासाठी रंगरंगोटी, फलक आदी कामे झाली आहेत़ राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान अंतर्गत तालुक्यातील ३०५ बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात यशस्वी झालो आहे़ उर्वरित कुपोषित बालकांसाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत - जी़जी़ सोनार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी़