शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

२० रूग्णवाहिकांसह ३० डॉक्टर जिल्ह्यात

By admin | Updated: May 12, 2014 00:01 IST

हिंगोली : जिल्ह्यातील रूग्णांना जोखमीच्या वेळी अत्यावश्यक सेवा तातडीने मिळण्यासाठी आता जिल्हा रूग्णालयाच्या मदतीला १० रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील रूग्णांना जोखमीच्या वेळी अत्यावश्यक सेवा तातडीने मिळण्यासाठी आता जिल्हा रूग्णालयाच्या मदतीला १० रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सोबतच ३० डॉक्टर आणि २५ चालकही मिळणार आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात कामी पडणार्‍या या रूग्णवाहिका अद्ययावत ठेवण्यात येणार आहेत. दुर्गम ठिकाणाहून गरजू रूग्णांना घेऊन तातडीने रूग्णालयात जाता यावे, यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केद्रास रूग्णवाहिका देण्यात येणार आहेत. रूग्णांसाठी दिलेला १०८ टोलफ्री क्रमांक दाबताच रूग्णाहिका घटनास्थळी डॉक्टरांसह दाखल होणार आहे. एका रूग्णवाहिकेत २ डॉक्टर मिळून एकूण २० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातील १० पैकी ३ रूग्णवाहिकेत अ‍ॅडव्हॉन्स लाईफ सर्व्हीस बसविण्यात आली आहे. अन्य दोन रूग्णवाहिका अत्यावश्यक सेवासुविधासाठी राहणार आहेत. महत्वाच्या रूग्णालयात या रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. सर्व गरजू रूग्णांसाठी या रूग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहेत. गरोदर माता, अपघात आणि इमरजन्सी रूग्णांसाठी या रूग्णवाहिका कामी पडणार असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी) अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा जिल्हा सामान्य रूग्णालय २, उपजिल्हा रूग्णालय-वसमत, ग्रामीण रूग्णालय-औंढा नागनाथ, ग्रामीण रूग्णालय-कळमनुरी, ग्रामीण रूग्णालय-सेनगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र-आखाडा बाळापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र- गोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र-साखरा, प्राथमिक आरोग्य केंद्र-हट्टा येथे ही सुविधा मिळेल.