शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

सोमनाथ खताळ , बीड बदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते

सोमनाथ खताळ , बीडबदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते. १० टक्के ग्राहक मात्र बँकिंग व्यवहारात परिपूर्ण आहेत. ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, इतरांच्या मदतीने केलेले आर्थिक व्यवहार अनेकांच्या अंगलट आले. त्यामुळे बँकिंग ज्ञान वाढविण्याची गरज असल्याचा निष्कर्ष निघाला.पंतप्रधानांनी गरीबांचेही बँकेत खाते असावे, या उदात्त हेतूने जनधन योजना सुरू केली. मात्र, अनेकांना बँकेते खाते कसे खोलायचे ? पैसे खात्यावर कसे भरायचे ? कसे काढायचे ? धनाकर्ष, धनादेश म्हणजे काय ? हेच माहीत नाही. त्यामुळे जनधन सारख्या कितीही योजना आल्या तरी ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’ असेल तर या योजनांचा हेतू साध्य होणे शक्य नाही. अनेक ग्राहक तासनतास बँकांच्या पायऱ्यावर ताटकळतात, शिवाय अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात, असे अनुभव ग्रामीण ग्राहक बोलून दाखवितात.३० टक्के ग्राहक पेनाशिवाय बँकेतबँकेत यायचे म्हटले की पेन सोबत असणे गरजेचे आहे, मात्र सोबत पेन बाळगणे ३० टक्के लोकांना नकोसे वाटले तर ७० टक्के लोक स्वत:चा पेन घेऊन आले. स्लीप भरण्यासाठी अथवा बँकेत इतर अर्ज भरण्यासाठी ग्राहक दुसऱ्यांकडेच हात पसरत असल्याचे दिसून आले. काम झाल्यानंतर पेन परत देण्याऐवजी तसाच खिशाला अडकवण्याचे प्रकारही दिसून आले.अज्ञान पडतेय महागातआज अनेकांना बँकेचे व्यवहार कशाप्रकारे चालतात, आणि त्याचे काय नियम असतात, याची माहिती नसल्याने फसवाफसवीचे प्रकार घडतात, हे वास्तव आहे. मात्र बँकांनाही व्यवहाराच्या जनजागृतीसाठी वेळ नाही.