शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

२९ जणांना शस्त्र परवाना नाकारला

By admin | Updated: December 28, 2014 01:24 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद अलीकडच्या काळात गरजेपेक्षा अनेक जण प्रतिष्ठा म्हणूनही शस्त्र बाळगत आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने नवीन शस्त्र परवाना देताना कठोर धोरण अवलंबिले आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादअलीकडच्या काळात गरजेपेक्षा अनेक जण प्रतिष्ठा म्हणूनही शस्त्र बाळगत आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने नवीन शस्त्र परवाना देताना कठोर धोरण अवलंबिले आहे. पोलिसांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी नुकताच २९ जणांना शस्त्र परवाना देण्यास नकार दिला आहे. ३२ अर्जदारांपैकी केवळ तिघांनाच शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला आहे. शस्त्र परवाना नाकारण्यात आलेल्यांमध्ये एका आमदारपुत्राचाही समावेश आहे. जिल्ह्यात बँका, पतसंस्था, खासगी संस्था तसेच शेतवस्तीवर राहणारे, ज्यांच्यावर यापूर्वी हल्ला झाला अशा व्यक्तींनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने घेतलेले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून स्वसंरक्षणापेक्षा प्रतिष्ठेसाठी शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच शस्त्र परवान्यासाठी येणाऱ्या अर्जांची संख्याही वाढली आहे. सद्य:स्थितीत औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यात एकूण ५३४ जणांकडे शस्त्र परवाना आहे. औरंगाबाद शहरासाठी शस्त्र परवाना देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे आहेत, तर शहर वगळता उर्वरित जिल्ह्यासाठी हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या काही दिवसांत एकूण ५२ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत.या अर्जांवर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून संबंधित व्यक्तींबाबतचा अहवाल मागविला होता. पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्याकडून नुकताच ३२ अर्जदारांविषयीचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी यातील केवळ तिघांनाचा परवाना मंजूर केला आहे. उर्वरित २९ जणांना मात्र हा शस्त्र परवाना नाकारण्यात आला.ज्या तिघांना परवाना दिला त्यामध्ये एक शेतकरी, एक बँक आणि एक पेट्रोल पंपचालक आहे. आणखी २० अर्जदारांबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत शेतवस्तीवर राहणारे अनेक शेतकरी, व्यापारी, अधिकारी तसेच राजकीय पुढाऱ्यांनी शस्त्र परवाने घेतलेले आहेत. या परवान्यांच्या आधारे त्यांनी पिस्टल, रिव्हॉल्व्हर, बारा बोअर बंदूक, रायफल आदी प्रकारच्या बंदुका खरेदी केलेल्या आहेत. अलीकडच्या काळात काही वाळूमाफियांनीही शस्त्र परवाने घेतलेले आहेत.