२५ जि.प. शाळा होणार आयएसओ-जाधव

By Admin | Updated: November 29, 2014 00:28 IST2014-11-29T00:10:49+5:302014-11-29T00:28:09+5:30

जालना : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक शाळांमध्ये आयएसओ प्रमाणपत्र मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने १० शाळांमध्ये विविध सुविधा देण्यात येत

25 zip The school will become ISO-Jadhav | २५ जि.प. शाळा होणार आयएसओ-जाधव

२५ जि.प. शाळा होणार आयएसओ-जाधव


जालना : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक शाळांमध्ये आयएसओ प्रमाणपत्र मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने १० शाळांमध्ये विविध सुविधा देण्यात येत असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले की, इंग्रजी शाळांसारखीच सुविधा या शाळांना देण्याचा प्रयत्न आहे. या प्रत्येक शाळेला संगणक खोली, डिजिटल फलकांद्वारे शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त इत्यादींचा त्यात समावेश राहणार आहे. किनगाव ता. अंबड येथे शुक्रवारी तेथील शाळेच्या आयएसओ सुविधांसाठीचा शुभारंभ झाला, अशी माहितीही जाधव यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, माजी सभापती बप्पासाहेब गोल्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी स्वखर्चातून, लोकसहभागातून काही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जि.प. अध्यक्ष जाधव यांनी त्यांचा सत्कार केला.
२५ शाळा आयएसओ प्रमाणित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यातील १० शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 25 zip The school will become ISO-Jadhav