२५ जोडप्यांचा सामूहिक मेळाव्यात विवाह होणार

By Admin | Updated: April 20, 2016 23:54 IST2016-04-20T23:46:44+5:302016-04-20T23:54:55+5:30

बिलोली : मागच्या १४ वर्षांपासून परंपरा असलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी २५ जोडप्यांची नोंद झाल्याची माहिती संयोजक तथा जि़प़ सदस्य लक्ष्मण ठक्करवाड व समिती प्रमुख साईनाथ उत्तरवार यांनी दिली़

25 couples will get married in a mass gathering | २५ जोडप्यांचा सामूहिक मेळाव्यात विवाह होणार

२५ जोडप्यांचा सामूहिक मेळाव्यात विवाह होणार

बिलोली : मागच्या १४ वर्षांपासून परंपरा असलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी २५ जोडप्यांची नोंद झाल्याची माहिती संयोजक तथा जि़प़ सदस्य लक्ष्मण ठक्करवाड व समिती प्रमुख साईनाथ उत्तरवार यांनी दिली़
रविवारी २४ एप्रिल रोजी २५ शुभमंगल होणार आहेत़ बिलोली तालुका पातळीवर सन २००२ पासून सामुहिक सर्वपक्षीय सामुहिक विवाह सोहळा होण्याची प्रथा आहे़ यावर्षी सुद्धा संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली़ वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या़ समितीच्या वतीने वधूवरांना कपडे, मनी मंगळसूत्र, लग्न व्यवस्था, भोजनाची सोय आदी निशुल्क केले जाते़ २४ एप्रिलला दुपारी ११़३० वाजता सामुहिक विवाह होणार असून समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत़ दगडापूरस्थित महादेव आधारलिंग मंदिर परिसरात सर्व शुभमंगल धार्मिक विधीनुसार पार पडतील़ सूर्यकांत महाजन, दत्तात्रय उपलंचवार, कांता गंगावार, सुभाष पाटील, आबाराव संगनोड, विश्वनाथ दाचावार, प्राक़मटलवार, व्यंकटराव पाण्डवे, राजेश गंगमवार, विजय कुंचनवार, विठ्ठल रायकंठवार आदी परिश्रम घेत आहेत़(वार्ताहर)

Web Title: 25 couples will get married in a mass gathering