शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२३० कृषी सहायकांचे कामबंद आंदोलन सुरू

By admin | Updated: July 13, 2017 00:33 IST

परभणी : जिल्ह्यातील २३० कृषी सहायकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा व तयार करीत असताना संघटनेस विचारात घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी १० जुलैपासून जिल्ह्यातील २३० कृषी सहायकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. याबाबतचा शासन निर्णय ३१ मे २०१७ रोजी निर्गमित करण्यात आला. परंतु, अद्याप कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल? याबाबत कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने १० जुलैपासून जिल्ह्यातील २३० कृषीसहाय्यकांनी कामबंद आंंदोलन सुरू केले आहे. कृषीसहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची १०० पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत, त्याच अनुषंगाने अधिकारी तदर्थ पद्धतीने कृषीपर्र्यवेक्षकांची पदे भरण्यात यावीत, सुधारित आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावेत, या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. या आंदोलनामध्ये आर.के. यादव, यु.के. शेळके, बी.व्ही. काळदाते, आर.एस. मानवते, उमेश माने, हरिभाऊ जाधव, किरण सातपुते, सुहास धोपटे, जुनेद खान, सुभाष धबाले, प्रभाकर गिराम, रोशन करेवार, अशोक जाधव, वैजनाथ रणेर, प्रशांत देवकर, सुदाम उगले, विश्वंभर मोकाशे, नंदकुमार पवार, मदन मुंंडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य कृषीसहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.