शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

१९ साठवण तलाव ‘फुल्ल’

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

उस्मानाबाद : सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेखाली असणारा जिल्ह्याला मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद : सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेखाली असणारा जिल्ह्याला मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मागील चार ते पाच वर्षांत जिल्ह्यात भर पावसाळयात टँकरची संख्या शंभरावर होती मात्र आता टँकर संख्या तीनवर आली आहे. तसेच पाच तालुक्यांतील १९ तलाव हे शंभर टक्के भरले आहेत.जुलै महिना उजाडला तरी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट आले होते. जुलै महिन्यात टँकरची संख्या शंभरावर होती. मात्र त्यानंतर आॅगस्ट महिन्यात काही तालुक्यात पाऊस झाल्याने ही संख्या ७२ झाली तर विहीर व बोअरचे अधिग्रहणांची संख्याही ४६० झाली. मात्र आॅगस्ट महिन्यांच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या पावसाने टँकरची संख्या तीन तर अधिग्रहणांची संख्या ७ आहे. सद्य:स्थितीत भूम तालुक्यातील एक गाव व चार वाड्यावर दोन टँकरने पाणीपुरवठा तसेच दोन ठिकाणी अधिग्रहण करण्यात आले आहे. परंडा तालुक्यात एका टँकरने एका गावात पाणीपुरवठा व तीन गावांत पाच ठिकाणी अधिग्रहण करुन प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने विहिरी, विंधन विहीरीची पाणी पातळी कमालीची घट झालेली होती. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. मात्र आॅगस्ट महिन्यात शेवटच्या आठवडयात जिल्ह्याच्या विविध भागात जोराचा पाऊस झाल्याने या भागात विविध प्रकल्पातील पाणीसाठा चांगलाच वाढल्याने उस्मानाबाद जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब व लोहारा हे पाच तालुके सद्यस्थितीत टँकरमुक्त झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.