शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील हातोला गावात गेल्या अठरा वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यंदाही ही परंपरा कायम असून,

पारगाव : वाशी तालुक्यातील हातोला गावात गेल्या अठरा वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यंदाही ही परंपरा कायम असून, गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाच्या वतीने विविध मान्यवरांच्या व्याख्यांनासोबतच पाच वर्षांपासून वृक्ष लागवडीबाबत जनजागृतीचेही कार्य करण्यात येत आहे.पारगावपासून पाच किमी अंतरावर चार हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय. गावात हरिनाम सप्ताह, महापुरूषांच्या जयंती, गणेशोत्सव या कालावधीत ग्रामस्थांसोबतच राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही राजकीय वाद बाजुला ठेऊन एकत्रित येतात. येथील तरूणांनी अठरा वर्षांपूर्वी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. ती आजही कायम आहे. राजा शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबविली जातात. यात अनेक मान्यवरांच्या व्याख्यानांसोबतच विद्यार्थ्यांसाठी नृत्य, रांगोळी, क्रीडा, वर्क्तृत्व, महिलांसाठी पाककला आदी स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेतील विजेत्यांना गणेश विसर्जनाच्या दिवशी बक्षीस म्हणून रोपट्यांचे वाटप केले जाते. तसेच पुढच्या वर्षी या वृक्षाचे संगोपन करणाऱ्यास प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून रोख रक्कमही दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्येही वृक्ष लागवड करून त्याची जोपासणा करण्याची आवड निर्माण झाली आहे. याशिवाय गावात उल्लेखनिय काम करणाऱ्यांना मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘हातोला रत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मान होतो. त्यामुळे सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. (वार्ताहर)मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत बोलताना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब खवले म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी हे गणेश मंडळ आग्रही असून, आजपर्यंत मंडळाच्या वतीने अडीच हजार रोपांचे वाटप करण्यात आले आहे. यातील दोन हजारावर वृक्षांचे चांगल्या प्रकारे संवर्धनही झाले आहे. हा उपक्रम यापुढेही चालूच ठेवला जाणार आहे. या मंडळाच्या माध्यमातून अठरापगड जातीला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे खवले यांनी सांगितले.