शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

१८९ जि.प. शाळांत सेमीचा संकल्प

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

कंधार : नांदेड जि.प. शिक्षण समितीने तालुकास्तरावरील शिक्षण विभागाने जवळपास ५ शाळांत सेमी इंग्लिश सुरू करण्याचे आवाहन केले होते.

कंधार : नांदेड जि.प. शिक्षण समितीने तालुकास्तरावरील शिक्षण विभागाने जवळपास ५ शाळांत सेमी इंग्लिश सुरू करण्याचे आवाहन केले होते. कंधार शिक्षण विभागाने ते आव्हान स्वीकारले असून तब्बल सर्वच १८९ जि.प. शाळांत सेमी इंग्लिश सुरू करण्याचा संकल्प शुक्रवारी झालेल्या बैठकीत सोडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे धाडसी पाऊल मानले जात आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. जि.प. शाळेत शासनस्तरावरुन विविध सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी जि.प. शाळेत शिकत असलेल्या शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत. पायाभूत व भौतिक सुविधा, संगणक आदीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी विद्यार्थ्यांशी कमालीची स्पर्धा करु लागला. अपवाद वगळता खाजगी शिक्षण संस्थेत सुविधांची वाणवा आहे. तरीही विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशची सुविधा नव्याने उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे जि. प. शाळा अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली. विद्यार्थीसंख्या कमी होण्याचा धोका निर्माण होईल. यातून नांदेड जि.प. शिक्षण समितीने अभिनव उपक्रम हाती घेतला.२७ मे २०१४ रोजी जि.प. शिक्षण समितीने तालुकास्तरावरील शिक्षण विभागाला किमान ४-५ शाळात शै. वर्षे २०१४-२०१५ पासून सेमी इंग्रजी सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ६ जून रोजी कंधार तालुक्यातील केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यात सर्वच जि.प. शाळेत (१८९) पहिलीसाठी गणित इंग्रजी माध्यमातून आणि इयत्ता पाचवीसाठी गणित, विज्ञान इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याचा धोरणात्मक संकल्प करण्यात आला आहे.तालुक्यात जि.प. शाळांची संख्या १८९ एवढी आहे. त्यात प्राथमिक शाळा १८४ (३ उर्दूसह) व माध्यमिक शाळा ५ आहेत. १७ केंद्रांतर्गत असलेल्या शाळा असून कंधार केंद्रांतर्गत १५ शाळा, आंबुलगा १४, बहाद्दरपुरा-१३, बारुळ-१३, बोळका-११, चिखली-८, दिग्रस (बु)-१३, फुलवळ-११, गोणार-१०, पानभोसी-१२, रुई-१५, कौठा-१०, कुरुया-१२, मंगलसांगवी-८, शेकापूर-१३, शिराढोण-६ आणि उस्माननगर केंद्रांतर्गत ५ शाळा आहेत. बाचोटी, हासूळ शाळेने यापूर्वी आपला स्वतंत्र ठसा उमटविला होता. आता नवीन संकल्प शिक्षणाला नवीन चालना देणारा ठरणार आहे. (वार्ताहर)शिक्षण विभागाने केले होते आवाहन२७ मे २०१४ रोजी जि.प. शिक्षण समितीने ता. स्तरावरील शिक्षण विभागाला किमान ४-५ शाळात शैक्षणिक वर्षे २०१४-२०१५ पासून सेमी इंग्रजी सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ६ जून रोजी कंधार तालुक्यातील केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यात सर्वच जि.प. शाळेत (१८९) पहिलीसाठी गणित इंग्रजी माध्यमातून आणि इयत्ता पाचवीसाठी गणित, विज्ञान इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याचा धोरणात्मक संकल्प करण्यात आला आहे.शिक्षणक्षेत्रात काळानुरुप बदल होत आहेत. माहितीची नवीन दालने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिक भर टाकत आहेत. मराठी व इंग्रजी विषयाची योग्य सांगड घालून विद्यार्थ्यांना अधिक गुणवंत करण्याचा मानस आहे. सर्वांच्या सहकार्यातून ते शक्य आहे.- जी. आर. राठोड (गटशिक्षणाधिकारी, कंधार).