१७ अभियंत्यांच्या बदल्या

By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:40:03+5:302014-06-08T00:54:05+5:30

बीड: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका, जिल्हा परिषदेत कार्यरत जिल्ह्यातील १७ शाखा अभियंत्यांच्या बदल्या झाल्या आहेत़

17 Engineer transfers | १७ अभियंत्यांच्या बदल्या

१७ अभियंत्यांच्या बदल्या

बीड: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका, जिल्हा परिषदेत कार्यरत जिल्ह्यातील १७ शाखा अभियंत्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ शुक्रवारी याबाबतचे शासनादेश जीवन प्राधिकरणला प्राप्त झाले आहेत़
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून जिल्हा परिषदेत सात वर्षांपूर्वी प्रतिनियुक्तीवर आलेले १० शाखा अभियंता पुन्हा जीवन प्राधिकरणकडे गेले आहेत़ जीवन प्राधिकरणकडून जिल्हा परिषदेला पाच तर पालिकेकडून दोन शाखा अभियंता पुन्हा जीवन प्राधिकरणला बदलून गेले़ जिल्हा परिषदेत कार्यरत शाखा अभियंत्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) बीड उपविभागातील एस़ सी़ राख (बीड), पी़ एस़ तिडके (बीड), एऩ जी़ उबाळे (बीड), एम़ बी़ सानप (बीड), गेवराईचे ए़ एस़ धाये (बीड), बीड येथील अनिल तांदळे (माजलगाव), आष्टीचे सय्यद युनूस (माजलगाव), जी़ आऱ खोसे (अंबाजोगाई), एल़ डी़ हुले (अंबड), माजलगाव येथे कार्यरत सय्यद अख्तर (आष्टी) अशा बदल्या झाल्या़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जिल्हा परिषदेत बदली झालेल्या पाच जणांमध्ये अंबाजोगाईचे पी़ एम़ केंद्रे (बीड), बीडचे डी़ जी़ टेकाळे (बीड), ए़ एस़ परदेशी (बीड), एस़ उन्नीथन (पाटोदा), सुशीलकुमार सारणीकर (गेवराई) यांचा समावेश आहे़ पालिकेकडून जीवन प्राधिकरणमध्ये दोघांच्या बदल्या झाल्या़ बीड पालिकेतील एम़ एस़ वाघ (माजलगाव) तर अंबाजोगाईचे आऱ पी़ चव्हाण (अंबाजोगाई) येथे गेले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे ठाणे येथील मुख्य अभियंता डॉ़ हेमंत लांडगे यांनी आदेश काढले (प्रतिनिधी)

Web Title: 17 Engineer transfers