शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

टीईटीसाठी १६ हजार उमेदवार

By admin | Updated: October 31, 2014 00:35 IST

लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसाठी १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़

लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसाठी १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ आॅनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी २२ आक्टोबर पर्यंत ठेवण्यात आला होता़ तर मुळ प्रत दाखल करण्याचा कालावधी आॅक्टोबर पर्यंत ठेवण्यात आला होता़ या माध्यमातून गुरुवार अखेरपर्यंत टीईटीसाठी १६ हजार २०३ अर्ज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आले़ डीएड् व बीएड् च्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्यांदा टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे़ या दृष्टीकोनातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अर्ज मागविण्यात आले़ यामध्ये आॅनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी १ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबर हा कालावधी ठेवण्यात आला होता़ या अर्जाचे मुळ प्रत दाखल करण्याचा कालावधी ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत ठेवण्यात आला होता़ गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या भावी शिक्षकांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी सुरु केली़ अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याची सोय व्हावी या दृष्टीकोणातून जिल्ह्यातील १० तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्याकडे त्या त्या तालुक्यातील अर्ज स्विकृती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती़ अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सोय केल्यामुळे डी़एड़ व बी़एड़च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले़ लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, लातूर, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, देवणी, शिरुर अनंतपाळ, साकोळ या १० तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत महिनाभरात १६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत़ (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षीसाठी जिल्हाभरातून १६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केले़ या विद्यार्थ्यांची परीक्षा १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांनी दिली.