वीज पडून दगावलेल्यांना १६ लाखांची मदत

By Admin | Updated: May 31, 2016 23:14 IST2016-05-31T23:10:53+5:302016-05-31T23:14:26+5:30

बीड : मागील मार्चपासून वीज पडून दगावलेल्या ५ जणांपैकी चौघांना शासनाने प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वादळी

16 lacs of relief to the people | वीज पडून दगावलेल्यांना १६ लाखांची मदत

वीज पडून दगावलेल्यांना १६ लाखांची मदत

बीड : मागील मार्चपासून वीज पडून दगावलेल्या ५ जणांपैकी चौघांना शासनाने प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत केली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वादळी वाऱ्यामुळे विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात आतापर्यंत पाच जणांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला. शिरूर कासार तालुक्यातील शिरापूर धुमाळ येथील ज्योती गंगाराम बहीर, मारुती केदारे (रा. लोणी, ता. परळी), अशोक नरहरी दौंड (रा. दौंडवाडी, ता. परळी), शेख सुरैयाबी अयूब (रा. केज) व संदीप बाबासाहेब काळकुटे (रा. खर्डेवाडी, ता. बीड) यांचा यात समावेश आहे. संदीप काळकुटे वगळता उर्वरित चौघांना प्रत्येकी चार लाख रुपयांची शासकीय मदत मिळाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 16 lacs of relief to the people