प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपये मंजूर

By Admin | Updated: February 17, 2016 23:12 IST2016-02-17T23:04:36+5:302016-02-17T23:12:41+5:30

परभणी : जिल्ह्यातील ८ प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

16 crores sanctioned for primary hospitals | प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपये मंजूर

प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपये मंजूर

परभणी : जिल्ह्यातील ८ प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक घण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.फौजिया खान यांनी आरोग्याच्या संदर्भातील विविध समस्या मांडल्या. प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा केली. या बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांनी वरील माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल महिवाल, सी. ई. ओ. सुभाष डुंबरे यांच्यासह सोनाली देशमुख, शशीकला चव्हाण, नंदा राठोड, नंदिनी पानपट्टे, उज्ज्वला पाटील, रेखा कानडे, विश्वजित बुधवंत, रवी सोनकांबळे, आकाश लहाने, नागेश सोनपसारे, पाशा कुरेशी, हन्नूभाई आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: 16 crores sanctioned for primary hospitals