शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

१४८ पाझर तलावांची चौकशी गुंडाळली

By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST

गंगाराम आढाव , जालना लघु पाटबंधारे विभागाच्या पाझर तलाव व गाव तलावातील कामांमध्ये गैरव्हार झाल्याचे निष्पन्न होऊनही कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

गंगाराम आढाव , जालना२००७ ते २००९ या आर्थिक वर्षात लघु पाटबंधारे विभागाच्या (स्थानिक स्तर) विभागाने रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात केलेल्या पाझर तलाव व गाव तलावातील कामांमध्ये गैरव्हार झाल्याचे निष्पन्न होऊनही त्यासंदर्भात फारसे गांभीर्याने कारवाई झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान दोन तलावातील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर अन्य १४९ पाझर तलावाची चौकशी करण्याचा निर्णय एसीबीने घेतला होता. मात्र तो आता गुंडाळण्यात आल्या असल्याची कबुली खुद्द या खात्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.जिल्ह्यात १ एप्रिल २००७ ते २००९ या कालावधीत लघु पाटबंधारे विभागाने रोजगार हमी योजनेतून पाझर तलावासह गाव तलावाची शेकडो कामे हाती घेतली. परंतु तत्कालीन कार्यकारी अभियंता रघुवीर यादव यांच्यासह अन्य सहकारी अभियंत्यांनी या कामांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करून शेकडो कामे थातूर-मातूर पद्धतीने करण्यात आली. या कामात मजुरांऐवजी मशिनरींचाच मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. प्रत्यक्षात साईटवरील कामाची स्थिती न पडताळताच संबंधित अभियंत्यांनी परस्परच मोजमाप पुस्तिका लिहून घेतल्या. त्याची बिलेही तयार केली. संबंधित एजन्सीला हाताशी धरून त्या-त्या कामांचे टप्प्या-टप्प्याने कोट्यवधी रुपयांची बिले उकळली. २००७ ते २००९ तब्बत तीन वर्षे सुरू असलेल्या या प्रकराच्या विरोधात काही ग्रामस्थांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. परंतु लघु पाटबंधारे विभागाने एकाही तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे सन २०१० मध्ये खा. रावसाहेब दानवे यांनी अखेर लोकायुक्तांकडेच या संबंधी तक्रार केली होती. त्या आधारे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील पाझर तलाव क्र. ५ व जाफराबाद तालुक्यातील पापळ येथील पाझर तलाव क्र ८ या दोन तलावाच्या कामाची चौकशी केली. त्यात दाभाडी येथील तलावात ४ लाख ६१ हजार,४७८ रूपयाची तर पापळ येथील तलावासाठी ९ लाख ६५ हजार ५७३ रूपये ५३ पैसे एवढी वाढीव रक्कम अदा करून गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार २ मे २०१४ रोजी बदनापूर व टेंभूर्णी पोलिस ठाण्यात या तत्कालीन कार्यकारी अभियंता रघुवीर गणपतराव यादव, तत्कालीन उपविभागीय अभियंता भास्कर काशीनाथ जाधव, तत्कालीन शाखा अभियंता श्रीनिवास बाबाजी काळे, रामेश्वर अंबादास कोरडे (तत्कालीन शाखा अभियंता, जालना, गणेश मजूर सहकारी संस्था भोकरदनचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशपांडे, वडीगोद्रीच्या गुरूदेव मजूर सहकारी संस्थेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र एकनाथ खोमणे व गणेश मजूर सहकारी संस्था तोंडोळीचे ढवळे अशा सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच अभियंत्यांच्या घरांची झडती घेतली होती. यात शाखा अभियंता श्रीनिवास काळे यांच्या घरी १० तोळे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने व ६७ हजार रुपये रोख आढळून आले. तर उपअभियंता भास्कर जाधव यांच्या घरात कपाटात ६ किलो ३०० ग्रॅम सोने आढळून आले. या कारवाईत एकूण ३ कोटी ७८ लाखांची मालमत्ता आढळून आली आहे. सदर गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात झालेल्या १४८ पाझर तलावांच्या कामांचीही चौकशी करण्याचा निर्णय एसीबीने घेतला होता. त्या अनुषंगांने वर्तमान पत्रात वृत्तही प्रकाशित झाले होते. त्यानुसार २० ते १५ पाझर तलावाच्या कामास एसीबी व जिल्हा परिषदेच्या अभियंत्यानी भेटी देऊन पाहणीही केली होती. मात्र चौकशीची कार्यवाही पुढे चालू न ठेवता ती बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दोन कामांच्या चौकशीसाठी दोन वर्षेया संदर्भात अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक प्रतापसिंह शिकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाझर तलावाच्या कामांची भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. हे या दोन कामांच्या चौकशीतून स्पष्ट झाले. या दोन कामांच्या चौकशीसाठी आमच्या खात्याला दोन वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळे दीडशे कामांची चौकशी करण्यासाठी किती वर्ष लागेल ? असा सवाल करून दोन पाझर तलावाच्या गैरव्यहार प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे उर्वरित कामांची चौकशी बंद केली असल्याचे सांगितले.दाभाडी व पापळ येथील पाझर तलावाच्या कामात प्रत्यक्षात साईटवरील कामाची स्थिती न पडताळताच संबंधित अभियंत्यांनी परस्परच मोजमाप पुस्तिका लिहून घेतल्या. त्याची बिलेही तयार करून गैरव्यवहार केला होता. हे प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जि. प. तांत्रिक विभागाच्या पथकाने केलेल्या चौकशीत उघड झाली.कोट्यवधीचे घबाडजालना जिल्ह्यातील ज्या दोन पाझर तलावाच्या कामांची चौकशी एसीबीने केली त्यात दहा लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित चारही अभियंत्यांच्या घराच्या झडतीत सात किलो सोन्यासह कोट्यवधीची अपसंपदा आढळून आली. त्यामुळेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात केलेल्या १४९ कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काही तलावाच्या कामांची पाहणीही एसीबी व जि.प. च्या तांत्रिक पथकाने संयुक्तपणे केली होती. मात्र त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात पडले. आता तर ही चौकशीच बंद केल्याचे सांगण्यात आले.