शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हदगावात १० महिन्यांत ९२ शाळा डिजिटल

By admin | Updated: April 26, 2016 23:47 IST

सुनील चौरे, हदगाव विद्यार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन अध्यापन होत आहे़ तालुक्यातील प्रत्येक शाळेवर एकच धून ऐकायला मिळत आहे़

सुनील चौरे, हदगावविद्यार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन अध्यापन होत आहे़ तालुक्यातील प्रत्येक शाळेवर एकच धून ऐकायला मिळत आहे़ आता एकच कित्ता़़़ गुणवत्ता़़़ गुणवत्ता़़़ ही. मंगळवारी सावरगाव (माळ), चोरंबा खुर्द, चोरंबा बु या मनाठा केंद्रातील शाळेचे डिजिटल रुमचे उद्घाटन सभापती, गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते झाले. दरम्यान, मागील १० महिन्यांत तालुक्यातील ९२ शाळा डिजिटल झाल्या आहेत. डिजिटलमुळे शाळेला इमारत, संरक्षक भिंत, खेळाचे साहित्य, रंगरंगोटी, टेबल-खुर्ची, पिण्याचे पाणी आदी सुविधा झाल्या आहेत. तालुक्यातील १४६ शाळांपैकी ९२ डिजिटल शाळेचे उद्घाटन झाले़ तालुक्यात १५ जून २०१५ पासून या उपक्रमाला कुसळवाडी शाळेने सुरुवात केली़ १० महिन्यांमध्ये ९२ शाळा आजघडीला तंत्रस्रेही झाल्या़ कोणत्याच शासकीय निधीचा उपयोग न घेता शिक्षक, पालक, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी व लोकसहभागातून आतापर्यंत पावणेदोन कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती यावेळी सभापती बालासाहेब कदम यांनी सावरगाव (माळ) येथील डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी दिली़ याच कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी बी़आय़येरपुलवार यांनी शिल्लक राहिलेल्या शाळा येत्या शैक्षणिक क्षेत्रात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले़ मनाठा केंद्रातील १७ पैकी १३ शाळा डिजिटल झाल्याने केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे त्यांनी कौतुक केले़ पुणे येथील लल्ला संस्थेने ज्या शाळा लोकवर्गणीसाठी कमी पडत आहेत, त्या शाळांना प्रत्येकी ३० हजार रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ यामुळे मूर्तस्वरूप जसे भूकंप, त्सुनामी, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या संकल्पना पडद्यावर दाखविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायम राहतात़ तळणी जिल्हा परिषद शाळा लोकवर्गणी जास्त झाल्यामुळे वातानुकुलित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़ सावरगाव (माळ) येथील पालकांनी प्रथम व द्वितीय सत्रात २०० रुपये दिले़ तरीही एका वर्षात एक वर्ग डिजिटल होईल असे सांगितले़सभापती बालासाहेब कदम, गटशिक्षणाधिकारी बी़ आय़ येरपुलवार, केंद्रप्रमुख सुधीर गोडघासे, केंद्रीय मुख्याध्यापक धोबे, विस्तार अधिकारी अंजली कापसे, शाळेचे मुख्याध्यापक पंजाबराव देशमुख, मुसाळे, मसाजी सोनाळे, शिंदे, सिद्दीकी, राहुल नरवाडे, बेबी राठोड, खंडू जोशी, विजय चौरे, विजय बेंडके, भोळे, जयस्वाल, संभाजी पाटील, गजानन डाके, गारोळे, सरपंच उपस्थित होते़