हदगावात १० महिन्यांत ९२ शाळा डिजिटल

By Admin | Updated: April 26, 2016 23:47 IST2016-04-26T23:35:06+5:302016-04-26T23:47:06+5:30

सुनील चौरे, हदगाव विद्यार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन अध्यापन होत आहे़ तालुक्यातील प्रत्येक शाळेवर एकच धून ऐकायला मिळत आहे़

In 10 months 92 schools in Hadagad | हदगावात १० महिन्यांत ९२ शाळा डिजिटल

हदगावात १० महिन्यांत ९२ शाळा डिजिटल

सुनील चौरे, हदगाव
विद्यार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन अध्यापन होत आहे़ तालुक्यातील प्रत्येक शाळेवर एकच धून ऐकायला मिळत आहे़ आता एकच कित्ता़़़ गुणवत्ता़़़ गुणवत्ता़़़ ही. मंगळवारी सावरगाव (माळ), चोरंबा खुर्द, चोरंबा बु या मनाठा केंद्रातील शाळेचे डिजिटल रुमचे उद्घाटन सभापती, गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते झाले. दरम्यान, मागील १० महिन्यांत तालुक्यातील ९२ शाळा डिजिटल झाल्या आहेत.
डिजिटलमुळे शाळेला इमारत, संरक्षक भिंत, खेळाचे साहित्य, रंगरंगोटी, टेबल-खुर्ची, पिण्याचे पाणी आदी सुविधा झाल्या आहेत. तालुक्यातील १४६ शाळांपैकी ९२ डिजिटल शाळेचे उद्घाटन झाले़ तालुक्यात १५ जून २०१५ पासून या उपक्रमाला कुसळवाडी शाळेने सुरुवात केली़ १० महिन्यांमध्ये ९२ शाळा आजघडीला तंत्रस्रेही झाल्या़ कोणत्याच शासकीय निधीचा उपयोग न घेता शिक्षक, पालक, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी व लोकसहभागातून आतापर्यंत पावणेदोन कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती यावेळी सभापती बालासाहेब कदम यांनी सावरगाव (माळ) येथील डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी दिली़ याच कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी बी़आय़येरपुलवार यांनी शिल्लक राहिलेल्या शाळा येत्या शैक्षणिक क्षेत्रात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले़ मनाठा केंद्रातील १७ पैकी १३ शाळा डिजिटल झाल्याने केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे त्यांनी कौतुक केले़ पुणे येथील लल्ला संस्थेने ज्या शाळा लोकवर्गणीसाठी कमी पडत आहेत, त्या शाळांना प्रत्येकी ३० हजार रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी दिली़
यामुळे मूर्तस्वरूप जसे भूकंप, त्सुनामी, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या संकल्पना पडद्यावर दाखविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायम राहतात़ तळणी जिल्हा परिषद शाळा लोकवर्गणी जास्त झाल्यामुळे वातानुकुलित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़ सावरगाव (माळ) येथील पालकांनी प्रथम व द्वितीय सत्रात २०० रुपये दिले़ तरीही एका वर्षात एक वर्ग डिजिटल होईल असे सांगितले़
सभापती बालासाहेब कदम, गटशिक्षणाधिकारी बी़ आय़ येरपुलवार, केंद्रप्रमुख सुधीर गोडघासे, केंद्रीय मुख्याध्यापक धोबे, विस्तार अधिकारी अंजली कापसे, शाळेचे मुख्याध्यापक पंजाबराव देशमुख, मुसाळे, मसाजी सोनाळे, शिंदे, सिद्दीकी, राहुल नरवाडे, बेबी राठोड, खंडू जोशी, विजय चौरे, विजय बेंडके, भोळे, जयस्वाल, संभाजी पाटील, गजानन डाके, गारोळे, सरपंच उपस्थित होते़

Web Title: In 10 months 92 schools in Hadagad