शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची चिंता वाढली

By admin | Updated: July 9, 2014 23:23 IST

ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी

आदिवासी विकास प्रकल्प : आदिवासी विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेशचंद्रपूर : ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणासाठी शासनाने भार उचलला आहे. मात्र शासनाकडून संस्थेला देण्यात येणारा भत्ता परवडत नसल्याचे कारण सांगून येथील संस्थेने विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. मागील १० ते १२ दिवसांपासून सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या कायम आहे. दरम्यान, तात्पुरत्या स्वरुपात जुन्याच संस्थेत विद्यार्थी राहात आहे. मात्र आता पालकांची चिंता वाढली आहे.आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील १२३ विद्यार्थ्यांना निवासी इंग्रजी शिक्षणासाठी येथील एका इंग्रजी मिंडियमच्या शाळेत प्रवेश दिला. या शाळेत विद्यार्थी आजपर्र्यंत शिक्षण घेत होते. मात्र सदर संस्थेने देण्यात येणारा निवासी भत्ता परवडत नसल्याचे कारण सांगून पालकांनी शाळेतून विद्यार्थ्यांना काढण्याचे सांगितले. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या काही सदस्यांनी मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री तसेच सचिवांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात असलेली समस्या तात्पुरत्या स्वरुपात दूर झाली. मात्र कायम समस्या मिटली नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. यापूर्वी शासन ३२ हजार ५०० रुपये प्रती विद्यार्थी एका वर्षांसाठी खर्च करत होते. आता प्रती विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपये खर्च करणार असल्याचे समजले. मात्र विभागाला अद्यापही जिल्हास्तरीय संस्था मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांची समस्या कायम आहे.(नगर प्रतिनिधी)