शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशनातून जुळले ३० जणांचे संसार

By admin | Updated: May 15, 2015 01:04 IST

पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात चालविण्यात येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्राने मागील वर्षभरात ३८६ प्रकरणात समझोता घडवून आणला आहे.

चंद्रपूर : पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात चालविण्यात येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्राने मागील वर्षभरात ३८६ प्रकरणात समझोता घडवून आणला आहे. तर ‘माझ काय चुकलं’ असे म्हणत संसार रूपी गाडा तोडण्याच्या वाटेवर असलेल्या ३० जणांना समुपदेशनातून एकत्र आणण्यात समुपदेशन कक्षाला यश आले आहे. समुपदेशनातून महिला सुरक्षा करणारे हे केंद्र महिला व कुटूंबाना आधार देणे यासोबतच महिला सहाय कक्षामार्फत अनेक युवती व महिलांना मनोधैर्य योजनेतंर्गत लाभ मिळवून देण्याचे काम करीत आहे.महिलांच्या कौटुंबिक व इतर तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात स्वतंत्र असा महिला तक्रार निवारण केंद्र कक्ष आहे. या कक्षामार्फत महिलांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येतो. सध्या चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय महिला तक्रार निवारण कक्ष आहे. बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपूरी, मूल व राजूरा या ठिकाणी अशाच प्रकारचा कक्ष प्रस्तावित आहे.या कक्षात गेल्या वर्षभरात महिलांनी विविध प्रकारच्या एक हजार तक्रारी नोंदविल्या. यापैकी ३८६ प्रकरणात समझोता करण्यात या कक्षाला यश प्राप्त झाले. तर तर ३० जणांचे संसार तुटण्यापासून वाचविण्यात आले. उर्वरीत तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी त्या त्या पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आल्या आहेत. महिला तक्रार निवारण केंद्रात आॅनलाईन तक्रारही घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते. केवळ कार्यालयातच महिलांच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाही तर महिला व मुलींमध्ये जनजागृती करण्याचे काम या कक्षामार्फत सुरू आहे. कक्षाच्या प्रमुख असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा खरसान यांनी गेल्या सहा महिण्यात ७ महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेऊन युवतींच्या समस्या व त्यावरील उपाय योजनाबाबत मार्गदर्शन केले. सोबतच इंटरनेटच्या माध्यमातून होणारी युवतींची फसवणूक व अभद्र व्यवहाराबाबत जागृती निर्माण करण्याचे काम सुरू आहे.तक्रारदार महिलांची व युवतींची केवळ समुपदेशन करूनच हा कक्ष थांबत नाही, तर सर्वकाही सुरळीत होईपर्यंत त्यांच्या संर्पकात सुध्दा राहतो. त्यामुळे महिला सहायता केंद्रात महिला आपल्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंदवितात. महिला व बाल कल्याण विभागातर्फे या ठिकाणी समुपदेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)महिला सुरक्षेला प्राधान्यमहिलावर होणाऱ्या अत्याचाराचा निपटारा करण्यासाठी महिला सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पीडित महिलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येते. त्याचबरोबर महिला व मुलींच्या अनैतिक प्रकारास प्रतिबंध करण्याकरीता या कक्षामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रकरणांवर कक्षातर्फे उपाययोजनाहुंडाबळी, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालून उपाययोजना, कामकरी महिलांच्या लैगिक शोषणावर प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, बालविहावर प्रतिबंध, भ्रृणहत्या रोखणे इत्यादी कामे या कक्षामार्फत सुरू आहेत. महिलांना आॅनलाईन तक्रार नोंदविण्याची सोयही समुपदेशन केंद्रामार्फत करून देण्यात आली आहे. ंमहिला तक्रार निवारण कक्षातर्फे महिलांना न्याय देण्यासोबतच कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. हा कक्ष महिलांसाठी आधार असून महिलांनी व युवतींनी आपल्या तक्रारी या कक्षास नोंदविल्यास त्यांना निश्चीत न्याय दिल्या जाईल. शाळा व महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शन करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम कक्षामार्फत सुरू आहे.- वर्षा खरसानपोलीस उपनिरीक्षक, कक्ष प्रमुख